नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या सुरुवातीला दररोज सकाळी वर्तमानपत्राला मुकणारे लोक आवर्जून आपल्या पसंतीच्या वृत्तपत्राची पीडीएफ आवृत्ती वाचायचे. वृत्तपत्रापासून कोरोनाचा संसर्ग होत नाही आणि वृत्तपत्रे सुरक्षित आहेत, हे अध्ययानातून स्पष्ट झाल्यानंतरही आजही अनेक जण सर्रास बेकायदेशीरपणे सुवाह्य प्रलेख स्वरूपातील (पीडीएफ) वृत्तपत्र डाऊनलोड करतात. तथापि, असे करणे व्हॉटस्ॲप ग्रुप्ससारख्या ॲडमिन्स आणि सदस्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिलेला असताना हा प्रकार चालू आहे.सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील पवन दुग्गल यांनी म्हटले आहे की, विनापरवानगी वृत्तपत्रांच्या पीडीएफ आवृत्तीच्या सशुल्क सामग्रीचे परिसंचारण कायद्याचे उल्लंघन ठरते. मालकाच्या परवानगीशिवाय वृत्तपत्राच्या डिजिटल आवृत्तीचे परिसंचारण करणे, मालकीहक्क अधिनियम (कॉपीराईट ॲक्ट) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील (इन्फॉर्मेशन टेक्नॉलाॅजी ॲक्ट) कलम ४३ चे उल्लंघन होय.माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील (इन्फॉर्मेशन टेक्नॉलाॅजी ॲक्ट) कलम ४३ यात स्पष्ट म्हटले आहे की, एखाद्याने संगणकीत स्रोतातील एखादी माहिती नष्ट करण्याचा किंवा हटविणे किंवा त्याचे मूल्य वा उपयोगिता कमी करण्याचा प्रयत्न करणे, अवैध आहे. असे करणारी व्यक्ती तिच्या या कृतीने प्रभावित झालेल्या व्यक्तीला नुकसानभरपाई देण्यास उत्तरदायी आहे. वृत्तपत्र वाचण्याची ही पद्धत जोखमीची आहे. कारण वृत्तपत्रातील साम्रगीशी एखादी व्यक्ती छेडछाड करण्याची शक्यता आहे. ...तर ग्रुप ॲडमिन दोषीइंडियन न्यूजपेपर सोसायटीनेही (आयएनएस) स्पष्ट केले आहे की, अनधिकृतपणे ई-पेपर किंवा यातील माहिती साम्रगीची नक्कल करून सोशल मीडियावर प्रसारित करणे बेकायदेशीर आहे. पीडीएफ वृत्तपत्र संपर्क-संदेशात्मक व्यासपीठावर प्रसारित केल्यास ग्रुप ॲडमिन दोषी असेल. अशा लोकांना कठोर कारवाईसोबत जबर दंडही सोसावा लागू शकतो.
पीडीएफ वृत्तपत्र सोशल मीडियावर प्रसारित करणे बेकायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 4:36 AM