अतिरेक्यांचा काटा काढण्यासाठी अतिरेकी वापरणे गैर नाही - पर्रीकर

By admin | Published: May 22, 2015 09:47 AM2015-05-22T09:47:26+5:302015-05-22T09:47:55+5:30

देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवणा-या अतिरेक्यांना संपवण्यासाठी अतिरेक्यांचाच वापर केला तर त्यात गैर काय असे विधान संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले आहे.

It is not unnecessary to use terrorists to extract terrorists' thorns - Parrikar | अतिरेक्यांचा काटा काढण्यासाठी अतिरेकी वापरणे गैर नाही - पर्रीकर

अतिरेक्यांचा काटा काढण्यासाठी अतिरेकी वापरणे गैर नाही - पर्रीकर

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवणा-या अतिरेक्यांना संपवण्यासाठी अतिरेक्यांचाच वापर केला तर त्यात गैर काय असे विधान संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अतिरेक्यांचा काटा काढण्यासाठी गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने ही पद्धत वापरली जात असल्याचा' गौप्यस्फोट केला. 
एखादा देश माझ्या देशाविरुद्ध कारवाई करत असेल तर ते रोखण्यासाठी मी स्वयंप्रेरणेने पावले उचलेन. 'काट्याने काटा काढणे' अशी एक म्हण आहे आणि तसे वागण्यात काही गैर नाही, असे ते म्हणाले.  ' अतिरेक्यांच्या विरोधात लढण्यासाठी प्रत्येक वेळेस लष्करालाच आघाडीवर जाण्याची गरज काय? गुप्तचर यंत्रणांच्या माध्यमातून अतिरेक्यांवर नजर ठेवून , त्यांच्यात फूट पाडून ( त्यांचा खात्मा करण्याची) ही मोहिम राबवली जाते' असे त्यांनी सांगितले. 'अनेकवेळा अतिरेक्यांना दहशतवादाच्या लढाईत ओढण्यासाठी पैशाचं आमिष दाखवलं जातं. जर अशा पद्धतीचे लोक या संघटनांमध्ये असतील तर त्यांचा वापर करण्यात काय हरकत आहे?' असेही त्यांनी विचारले.
दरम्यान यामुळे गेल्या काही दिवसांत सीमेपलीकडून होणा-या गोळीबाराचे प्रमाणही ३० टक्क्यांनी घटले असून २०१४ या वर्षांत ११० दहशतवाद्यांना ठार मारल्याचा दावा पर्रीकर यांनी केला आहे. 
 

Web Title: It is not unnecessary to use terrorists to extract terrorists' thorns - Parrikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.