- संतोष ठाकूर ।लोकमत न्यूज नेटवर्कदेशातील बँका यापुढे एटीएमप्रमाणे काम करू लागतील. म्हणजेच खातेधारकांना बँकेच्या कोणत्याही शाखेतून व्यवहार करणे शक्य होईल. व्यवहारासाठी त्यांना आपल्या शाखेत जावे लागू नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. रिझर्व्ह बँक आणि सर्व बँकांशी बोलणी सुरू आहेत, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर ‘लोकमत’ला सांगितले.
देशात मोठ्या दोन-तीन निवडक बँकाच राहाव्यात, यासाठी सरकार आग्रही आहे. त्यामुळे लागणारे तंत्रज्ञानही गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या.
पेट्रोल-डिझेलचा भाव वाढविल्याने महागाई वाढेल?नाही. आम्ही गेल्या पाच वर्षांत महागाई नियंत्रणात आणली. विचारविनिमयानंतरच दरवाढ केली. महागाईचा दर सतत कमी असेल, तरी विकासाची गती राखता येत नाही आणि ती खूप अधिक असूनही चालत नाही. अशा स्थितीत सरकार व्हर्च्युअल सिद्धांतावर काम करते, ज्यात विकास आणि प्रगती साधताना जीवन सुसह्य व्हावे, याकडे लक्ष दिले जाते.वित्त विधेयकात पेट्रोलचे भाव १० तर डिझेलचे ४ रुपयांनी वाढविण्याचा प्रस्ताव आहे. सर्वसामान्यांना याची झळ बसेल?केवळ २ रुपयांनी दर वाढविला जाणार आहे. वित्त विधेयकात वाढीव दरच सांगितला जातो. यामुळे प्रत्यक्ष दर वाढवताना संसदेची मंजुरी मिळवण्याची अडचण येत नाही. वित्त विधेयकात प्रस्तावित केल्याप्रमाणे दर वाढवले जातीलच, असे नाही.
बेकारी कमी करण्यासाठी काय उपाययोजना आहेत?जटिलता कमी करण्यासाठी श्रमविषयक नियमांची संख्या कमी केली आहे. युवाशक्तीला नोकऱ्या मिळत नसल्याने मोठे नुकसान होते. म्हणून आम्ही युवकांचा कौशल्य विकास, नोकरी करणाऱ्यांना नवी कौशल्ये आत्मसात करण्यात प्रवृत्त करणे यासाठी यासाठी प्रयत्न करीत आहोत. लघू-सूक्ष्म-मध्यम उद्योगांसोबत स्टार्ट अपलाही महत्त्व दिले आहे. यामुळे रोजगार वाढेल.लहान उद्योगांना पैसा मिळत नाही. बिगर बँक कंपन्या वित्तपुरवठ्यासाठी पुढे येत नाहीत. एनपीएमध्ये मोठी वाढ होत आहे..?बिगर बँक कंपन्यांनी (िएनबीएफसी) दिलेल्या कर्जांना १० टक्के सरकारी हमीचा निर्णय आम्ही घेतला आहे. दुसरीकडे आम्ही एनपीए कमी केला आहे. उद्योगांना उत्पादने जपान व युरोपमध्ये आपली उत्पादने विकता यावीत, यासाठी पावले उचलत आहोत. रिजर्व्ह बँकही यासाठी तयार आहे.
सोन्यावर तसेच श्रीमंत व अतिश्रीमंतांवरही कर वाढवला. त्यामुळे नाराजी आहे..?सोने खरेदी करणाºयांवर आम्ही टॅक्स लावला आहे. सोने आयातीसाठी परकीय चलन मोजावे लागते. त्यामुळे सोने खरेदीवर टॅक्स भरावाच लागेल. सोने भारतात आणून त्यापासून तयार केलेले दागिने परदेशात पाठवण्यावर कर लावलेला नाही. त्यामुळे कारागिरांवर परिणाम होणार नाही. आम्ही श्रीमंतावर कर लावला हे खरे आहे. पण आम्ही त्यांना धन्यवादही दिले आहेत कारण त्यांनी दिलेल्या करांतूनच मुंबईतील उपनगरी रेल्वे तसेच अन्य शहरांमध्ये मेट्रो चालवणे शक्य होते. करातून मिळालेल्या पैशातूनत सरकारला हे मोठे उपक्रम चालवता येतात.मुंबई कनेक्शनब्रिटिश मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी बजेटसाठी बॅगऐवजी पिशवी वापरण्याचा निर्णय घेतला. ही बाब पंतप्रधानांना कळविण्यात आली होती. त्यांनी कोणताही आक्षेप घेतला नाही. ही कापडी पिशवी निर्मला सीतारामन यांच्या मुंबईत राहणाºया मामींनी बनविली आहे. ही पिशवी घेऊन मामी प्रथम महालक्ष्मी आणि सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. महिला अर्थमंत्री म्हणून बजेट मांडणे हे खूप मोठे काम आहे. ते मांडण्याआधी मी या मंदिरात दर्शनासाठी जावे, असा मामींचा आग्रह होता. लग्नानंतर निर्मला सीतारामन २० वर्षे मुंबईत राहत होत्या.सोन्यावर टॅक्स लागेलचसोने खरेदी करणाºयांवर आम्ही टॅक्स लावला आहे. सोने आयातीसाठी परकीय चलन मोजावे लागते. त्यामुळे सोने खरेदीवर टॅक्स भरावाच लागेल.