२६/११च्या स्मृतिदिनी भारत-पाक मालिकेला परवानगी हे दुर्दैव
By admin | Published: November 27, 2015 1:33 AM
- राधाकृष्ण विखे यांची टीका
- राधाकृष्ण विखे यांची टीकाअहमदनगर : पाक पुरस्कृत २६/११च्या मुंबई हल्ल्याच्या स्मृतिदिनी भारतात शहिदांना आदरांजली वाहिली जात असताना, त्याच दिवशी श्रीलंकेत भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका खेळण्यास परवानगी मिळावी, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. बीसीसीआयने पैसा मिळविण्यासाठी नीतीमत्ता गहाण ठेवली की काय, असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी उपस्थित केला आहे. शरद पवार यांच्या सूचनेवरुन बीसीसीआयच्या अध्यक्षपदी शशांक मनोहर आरुढ झाले आहेत. पवारांनी दोन दिवसांपूर्वी शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. पवारांनी किमान महाडिकांच्या बलिदानाची आठवण ठेवून मनोहरांना मालिका रद्द करण्याची सूचना करायला हवी होती, असे विखे म्हणाले.शिवसेनेच्या नाकावर टिच्चून हा निर्णय घेण्यात आला आहे. सेनेची भूमिका प्रामाणिक असेल तर त्यांनी ही मालिका रद्द करण्यास सरकारला भाग पाडावे, असे आव्हान विखेंनी दिले आहे.......डान्सबार प्रकरणी इच्छाशक्तीचा अभावडान्सबार प्रकरणी राज्य सरकारकडे इच्छाशक्तीचा अभाव असल्याने ते सर्वोच्च न्यायालयात योग्य बाजू मांडू शकले नाहीत, अशी टीकाही विखे यांनी केली.