एवढंच बाकी राहिलं होतं; निवडणूक प्रचारात 'त्यानं' चक्क बाळाचं ढुंगण धुतलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 05:21 PM2018-11-27T17:21:23+5:302018-11-27T17:22:38+5:30

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत टीआरएस पक्षाचा एक समर्थक कार्यकर्ता लहान मुलाचे ढुंगण धुत असल्याचे दिसते.

It was just that; In the election campaign, he washed his baby's bum! | एवढंच बाकी राहिलं होतं; निवडणूक प्रचारात 'त्यानं' चक्क बाळाचं ढुंगण धुतलं!

एवढंच बाकी राहिलं होतं; निवडणूक प्रचारात 'त्यानं' चक्क बाळाचं ढुंगण धुतलं!

googlenewsNext

हैदराबाद - देशातील 5 राज्यामध्ये सध्या निवडणुकांचा फिव्हर दिसून येत आहे. या पाचही राज्यात नेते, कार्यकर्त्यांसह प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. नेत्यांच्या सभा सुरू आहेत, तर कार्यकर्ते दारोदारी जाऊन प्रचार करत आहेत. मात्र, तेलंगणातील टीआरएस पक्षाच्या एका उमेदवाराने कहरच केला. निवडणुकांचा प्रचार अभियान म्हणून त्यांने चक्क लहान मुलांचे ढुंगण धुतले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून आता हेच पाहायचं राहिलं होतं, अशी प्रतिक्रियाही नेटीझन्सकडून येत आहे. 

तेलंगणात टीआरएस पक्षाच्या प्रचारासाठी आलेल्या कार्यकर्त्याने चक्क लहान मुलाचे ढुंगण धुतले असून शेजारी उभे असलेले कार्यकर्ते जय तेलंगणाच्या घोषणा देता आहेत. तसेच कारच्या चिन्हाकडे बोट दाखवून मतदानाचे आवाहन करत आहेत. विशेष म्हणजे हा चिमुकला मतदानासाठी पात्र नाही, हेही या कार्यकर्त्यांना कळत नाही. तेलंगणात निवडणूक प्रचार करण्यासाठी काही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लोकांना अंघोळ घातली, काहींनी लोकांचे हेअरकट मारले तर एकाने तर चक्क चप्पल देऊन प्रचाराचा फंडा वापरला. पण, टीआरएस पक्षाच्या या कार्यकर्त्याच्या कारनाम्यामुळे आता हद्द झाली राव, असेच म्हणावे लागेल. 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत टीआरएस पक्षाचा एक समर्थक कार्यकर्ता लहान मुलाचे ढुंगण धुत असल्याचे दिसते. विशेष म्हणजे, तो चिमुकला रडत असून हे नेते-कार्यकर्ते हसत हसत कॅमेऱ्याला पोझ देतानाही या व्हिडीओत दिसत आहे. तर या चिमुकल्याच्या आईने त्याला आपल्या दोन्ही हातांनी पकडल्याचे दिसून येते. तेलंगणातील पत्रकार सीएच सुशील राव यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 

पाहा व्हिडिओ - 

Web Title: It was just that; In the election campaign, he washed his baby's bum!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.