नवी दिल्ली : लडाखमध्ये इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांचे (आयटीबीपी) जवान रात्रभर चीनच्या सैनिकांशी लढले होते व त्यांना चोख प्रत्युत्तर दिले होते. अशा चकमकींमध्ये सहभागी असलेल्या आयटीबीपीच्या २१ जवानांना वीरता पदकाने सन्मानित करण्याची शिफारस सरकारला करण्यात आली आहे, तर एकूण २९४ जणांना महासंचालक प्रशस्तीपत्राने सन्मानित करण्यात आले आहे.आयटीबीपीने प्रथमच या संघर्षाबाबत माहिती देताना सांगितले की, या जवानांनी संरक्षण तर केलेच पण, पुढे येत असलेल्या चीनच्या सैन्याला चोख प्रत्युत्तर दिले. हे जवान या भागात पूर्ण रात्रभर लढले. दगडफेक करणाऱ्या चीनच्या जवानांना जोरदार प्रत्युत्तर दिले. तर कोरोनाविरुद्धच्या लढाईत सेवा देणाºया आयटीबीपी व अन्य निमलष्करी दलाच्या ३५८ जवानांना विशेष पदकाने सन्मानित करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
‘आयटीबीपी’च्या बहादूर २१ जवानांना पदके
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 4:03 AM