नवी दिल्ली- भारतामध्ये प्रथमच रायबरेलीतील मॉडर्न कोच फॅक्टरी येथे वजनाने अत्यंत हलके आणि टिकाऊ असे रेल्वे कोच बनवले जाणार आहेत. हे कोच अॅल्युमिनियमपासून तयार केले जाणार आहेत. पुढील आर्थिक वर्षामध्ये हे डबे भारतामध्ये वापरले जाण्याची शक्यता आहे.पोलादी डब्यांच्या तुलनेत हे कोच वजनाने हलके असून कमी ऊर्जेच्या मदतीने खेचले जाऊ शकताच यामुळे रेल्वेची गतीही वाढवली जाऊ शकते. रेल्वेच्या आधुनिकीकरण मोहिमेत या नव्या डब्यांची निर्मिती केली जाणार आहे. दिल्ली मेट्रोसाठीही अॅल्युमिनियम कोचेसचा वापर केला गेला आहे.
मॉडर्न कोच फॅक्टरीने वर्षाला 250 कोच बनवण्याचा प्रस्ताव सादर केला आहे तर रेल्वे बोर्डाने वर्षाला 500 कोच बनवण्यासाठी प्रकल्प अहवाल बनवण्याचे सुचवले आहे. सध्या भारताकडे त्याचे तंत्रज्ञान नसल्यामुळे सुरुवातील या कोचची किंमत अधिक असेल.