उत्सव मूर्तीस गिरणा पात्रात जलाभिषेक दिंडी निघाली: भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

By admin | Published: November 14, 2015 12:09 AM2015-11-14T00:09:18+5:302015-11-14T00:09:18+5:30

जळगाव : कार्तिक प्रबोधिनी एकादशी निमित्त काढण्यात येणार्‍या प्रभू रामचंद्राच्या रथोत्सवानिमित्ताने पहाटे मंत्रोच्चाराच्या घोषात गिरणा पात्रात उत्सव मूर्तीस जलाभिषेक करण्यात आला. अतिशय मंगलमय असे वातावरण जुन्या गावातील श्रीराम मंदिर परिसरात होते.

Jalavhishek Dindi was born in the Girna area of ​​the celebration of the festival: the spontaneous participation of the devotees | उत्सव मूर्तीस गिरणा पात्रात जलाभिषेक दिंडी निघाली: भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

उत्सव मूर्तीस गिरणा पात्रात जलाभिषेक दिंडी निघाली: भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

Next
गाव : कार्तिक प्रबोधिनी एकादशी निमित्त काढण्यात येणार्‍या प्रभू रामचंद्राच्या रथोत्सवानिमित्ताने पहाटे मंत्रोच्चाराच्या घोषात गिरणा पात्रात उत्सव मूर्तीस जलाभिषेक करण्यात आला. अतिशय मंगलमय असे वातावरण जुन्या गावातील श्रीराम मंदिर परिसरात होते.

सकाळपासून कार्यक्रम
वहनोत्सवाच्या प्रारंभानिमित्ताने सकाळी ५ ते ७ या वेळात काकडारती होऊन पुजाभिषेक, मंगल आरतीने दिवसाची सुरूवात झाली. सकाळी ७ ते ८ या वेळात रामप्रहर महिला मंडळ (रामपेठ) यांनी भक्तीमय वातावरणात संत ज्ञानेश्वर माऊलीचा हरिपाठ व सामुदायिक रामनामाचा जप सुरू केल्याने या परिसरात अतिशय भक्तीमय वातावरण निर्मिती झाली होती. सकाळी ११.३० वाजता निमखेडी शिवारातील श्रीराम मंदिरापासून रामनामाचा व ज्ञानोबा- तुकारामाचा जयघोष करत पालखी निघून गिरणेच्या पात्रात सद्गुरू अप्पा महाराजांना मिळालेल्या प्रासादिक प्रभू श्रीरामाच्या चैतन्यमय उत्सवमूर्तीस व श्री संत मुक्ताबाईच्या पादुकांना मंत्रघोषात जलाभिषेक करण्यात आला. यावेळी पूजा विधी, भजन, आरती होऊन श्रीराम मंदिर संस्थानतर्फे महाप्रसाद देण्यात आला.

पालखी मार्गस्थ
जलाभिषेक विधीनंतर भाविक भक्तांसह रामनामाच्या जयघोषात श्री रामाची पालखी दुपारी चार वाजता जुन्या जळगावातील जुन्या मंदिरात परतली. संपूर्ण दिवसभर या निमित्ताने मंदिर परिसरातील वातावरण अतिशय मंगलमय, भक्तीमय झाले होते.

दर्शनासाठी रांगा
वहनोत्सवास प्रारंभ होणार असल्याने सकाळपासूनच मंदिर परिसरास यात्रेचे स्वरूप आले होते. परिसरातील नागरिकांची गर्दी या भागात झाली होती. भाविकांची व्यापार्‍यांची, महिला, युवक वर्गाची गर्दी झाल्याचे चित्र होते. प्रत्येक जण आपापल्या परिने सेवा देण्यासाठी धावपळ करत असल्याचे दृश्य या ठिकाणी पहायला मिळाले.
------
रंगरंगोटी अंतिम टप्प्यात
रथोत्सवानिमित्ताने राममंदिर परिसरात साफसफाईची कामे आटोपण्यात आली आहे. संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला असून रंगरंगोटीची कामे आता अंतिम टप्प्यात आहेत. रंगरंगोटीच्या कामांची सेवा देणारी मंडळी वर्षानुवर्षे या ठिकाणी सेवा देत असल्याचे दिसून आले. या बरोबच वहन रथाची डागडुजी, रंगकामही सायंकाळी सुरू होते.

Web Title: Jalavhishek Dindi was born in the Girna area of ​​the celebration of the festival: the spontaneous participation of the devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.