Jammu Kashmir Civic body Polls: जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाकडे १००, तर काँग्रेसकडे १५७ वॉर्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 04:48 AM2018-10-21T04:48:07+5:302018-10-21T04:48:21+5:30
जम्मू-काश्मीरमधील नगरपालिका निवडणुकांत भाजपने १०० वॉर्ड जिंकले असून, यापैकी २४ वॉर्डांत निवडणूक झाली
जम्मू/श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील नगरपालिका निवडणुकांत भाजपने १०० वॉर्ड जिंकले असून, यापैकी २४ वॉर्डांत निवडणूक झाली होती व ७६ वॉर्डांत बिनविरोध विजय मिळाला. काँग्रेसने १५७ वॉर्डांत विजय मिळवला. त्यात ७९ वॉर्डांत निवडणूक झाली, तर ७८ वॉर्डांत बिनविरोध विजय प्राप्त झाला. अपक्षांना १७८ वॉर्डांत विजय मिळाला. त्यातील १०३ वॉर्डांत निवडणूक झाली व ७५ वॉर्डांत ते बिनविरोध निवडून आले. नॅशनल कॉन्फरन्स व पीडीपीने या निवडणुकांवर बहिष्कार टाकला
होता.
खोऱ्यातील बहुसंख्य उमेदवार १0 वा त्याहून कमी मतांनीच विजयी झाले आहेत, तर पराभूत झालेल्यांना केवळ २ ते ५ मतेच पडली आहेत. खोºयात केवळ ४.५ टक्के इतकेच मतदान झाले होते. भाजपचे नेते बशीर अहमद श्रीनगरमधून विजयी झाले.
जम्मू व काश्मीर मिळून एकूण ७९ नगरपालिका असून, त्यांचे १,१४५ वॉर्डस् आहेत. त्यासाठी ३,३७२ अर्ज आले होते; पण बहुसंख्य अर्ज जम्मू व लेह, लडाख व कारगिलमधील होते.