लोक आपल्या इच्छेनं धर्मांतर करतायत, तलवारीच्या जोरावर नाही : गुलाम नबी आझाद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 09:44 AM2021-12-26T09:44:39+5:302021-12-26T09:45:18+5:30

लोकांनी फुटीरतावादी राजकारणाला बळी पडू नये, आझाद यांचं वक्तव्य.

jammu kashmir people poverty maharajas rule better than present govt says ghulam nabi azad | लोक आपल्या इच्छेनं धर्मांतर करतायत, तलवारीच्या जोरावर नाही : गुलाम नबी आझाद

लोक आपल्या इच्छेनं धर्मांतर करतायत, तलवारीच्या जोरावर नाही : गुलाम नबी आझाद

googlenewsNext

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते (Congress Leader) गुलाम नबी आझाद (Gulam Nabi Azad) हे शनिवारी जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) मधील उधमपूर येथे नाताळनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी लोकांना फुटीरतावादी राजकारणाला बळी पडू नये, असा सल्ला दिला. "सरपंच, जिल्हा, ब्लॉक विकास परिषदा, संसद सदस्य किंवा विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी लोकांमद्ये कधीपर्यंत फूट पाडत राहणार," असंही ते म्हणाले. 

"तुम्ही चांगलं काम, मानव सेवा आणि राजकारणाच्या जोरावर जे काही पाहिजे मिळवू शकतो. लोकांमध्ये फूट पाडून, द्वेष पसरवून आपल्या देशाचं, धर्माचं आणि समाजाचंच नुकसान होणार आहे," असं गुलाम नबी आझाद म्हणाले. यावेळी त्यांनी धर्मांतराच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. "लोक स्वेच्छेने धर्मांतर करत आहेत. कोणीही तलवारीच्या धाकाने करत नाही," असंही ते म्हणाले. ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आणि शांतता, बंधुत्व आणि करोनाच्या महासाथीचा खात्म्यासाठी प्रार्थना करण्यास आपण या कार्यक्रमात सहभागी झाल्याचेही ते म्हणाले. 

"मी कायमच दरबार मूवचं समर्थन करत होतो. महाराजांनी आपल्याला तीन गोष्टी दिल्या आणि त्या जम्मू काश्मीरच्या जनतेच्या हिताच्या होत्या. त्यापैकी एक दरबार मूव होती. महाराजा (हरी सिंह) यांनी जे या प्रदेशातील नसलेल्या लोकांपासून भूमी आणि नोकऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित केली होती," असंही ते म्हणाले.

महाराजांचं शासन चांगलं होतं
यावेळी त्यांनी जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यावरही भाष्य केलं. "आज इतक्या वर्षांनी आपण पाहतोय की महाराजा ज्यांना हुकुमशाह असं म्हटलं जायचं ते वर्तमान सरकारच्या तुलनेत चांगले होते. महाराजा जनतेच्या कल्याणासाठी काम करत होते. परंतु वर्तमान सरकारनं आमच्याकडून तिन्ही गोष्टी हिरावून घेतल्या," असंही आझाद म्हणाले.

Web Title: jammu kashmir people poverty maharajas rule better than present govt says ghulam nabi azad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.