नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला 370 कलम रद्द करत विभाजन करण्याचा प्रस्ताव आज राज्यसभेत मांडला होता. यावर राज्यसभेत आज चर्चा करण्यात आली. विरोधकांनी काश्मीरच्या विभाजनावर मत विभागणीची मागणी केल्याने राज्यसभेत चिठ्ठीद्वारे मतदान घेण्यात आले.
तत्पूर्वी अमित शहा यांनी राज्यसभेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. जम्मू-काश्मीरचेकलम 370 रद्द करण्याच्या प्रस्तावावर भाजपा व्होटबँकेचे, जातीयवादाचे राजकारण करत असल्याची टीका करण्यात येत आहे. मात्र, काश्मीरमध्ये केवळ मुस्लिमच राहतात का? तुम्हाला काय म्हणायचे आहे. काश्मीरमध्ये मुस्लिम, हिंदू, शीख, जैन, बुद्धिस्टही राहतात. जर 370 कलम चांगले असेल तर ते सर्वांसाठी चांगले आणि जर वाईट असेल तर सर्वांसाठी वाईटच असणार असल्याचे अमित शहा यांनी सांगितले.