Jammu-Kashmir: काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून जैश-ए-मोहम्मदच्या मॉड्यूलचा भंडाफोड, 8 दहशतवादी ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 09:27 PM2022-05-24T21:27:53+5:302022-05-24T21:28:20+5:30
Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातून सुरक्षा दलाने जैश-ए-मोहम्मदशी संबंधित 8 दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं आहे.
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांच्या संयुक्त कारवाईत पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरामध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी मॉड्यूलचा भंडाफोड करण्यात आला आहे. याअंतर्गत 8 दहशतवाद्यांनाही अटक करण्यात आली आहे. या दहशतवाद्यांकडून दारुगोळ्यासह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुश्ताक अहमद, इश्फाक अहमद, मंजूर अहमद, फयाज अहमद, शब्बीर अहमद मोहम्मद लतीफ, शिराज अहमद आणि वसीम अहमद अशी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. सीआरपीएफ आणि लष्कराच्या जवानांच्या संयुक्त कारवाईत या दहशतवादी मॉड्यूलचा भंडाफोड करण्यात आला आहे.
गेल्या महिन्यातही जैशच्या दहशतवाद्याला अटक
गेल्या महिन्यातही पुलवामामध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी मॉड्यूलचा भंडाफोड करण्यात आला होता, ज्यामध्ये तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. या कारवाईत दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात दारुगोळाही जप्त करण्यात आला. पुलवामा पोलिसांनी ही कारवाई केली. ओवेस अल्ताफ, आकिब मंजूर आणि वसीम अहमद अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. प्राथमिक तपासात हे तिघेही गेल्या अनेक महिन्यांपासून जैश संघटनेशी संबंधित असल्याचे समोर आले आहे.