Jammu Kashmir : पुलवामा चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 08:37 AM2019-02-01T08:37:19+5:302019-02-01T08:43:20+5:30
जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील राजपुरा परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी (1 फेब्रुवारी) सकाळी चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.
श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील राजपुरा परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी (1 फेब्रुवारी) सकाळी चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. खात्मा करण्यात आलेले हे दहशतवादी 'जैश-ए-मोहम्मद' संघटनेतील असल्याची माहिती समोर आली आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे.
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटेपासून चकमक सुरू झाली आहे. पुलवामामध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे.
Jammu and Kashmir: Two terrorists killed in encounter with security forces in Rajpora area of Pulwama, identified as Shahid Ahmad Baba and Aniyat Ahmad Ziger. Both terrorists are affiliated with Jaish-e-Mohammed (JeM). One SLR and one Pistol recovered from them. https://t.co/EDXk1xmvZF
— ANI (@ANI) February 1, 2019
जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये गुरुवारी (31 जानेवारी) पोलीस स्टेशनवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. या ग्रेनेड हल्ल्यात दोन सीआरपीएफ जवानांसह पाच जण जखमी झाले होते. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान,गेल्या 5 दिवसांत काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांनी 20 हून अधिक वेळा ग्रेनेड हल्ले केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ग्रेनेड हल्ला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केला आहे. यापूर्वी झालेल्या हल्ल्याची जबाबदारीही जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेने घेतली होती.
Jammu and Kashmir: Two terrorists have been killed in an encounter with security forces in Rajpora area of Pulwama. More details awaited. pic.twitter.com/mRww1k5t5G
— ANI (@ANI) February 1, 2019
J&K: A terrorist lobbed grenade at CRPF & J&K police pesonnel near Shairbagh police station in Anantnag, today. 2 CRPF personnel and 3 civilans suffered splinter injuries, shifted to civil hospital in Janglat Mandi, their condition is stable. https://t.co/ziK3wOaXTW
— ANI (@ANI) January 31, 2019