जेईई : पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना आणखी एक संधी?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 04:48 AM2020-09-01T04:48:48+5:302020-09-01T04:52:08+5:30

नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक डॉ. विनीत जोशी यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. ते म्हणाले की, जेईई मुख्य परीक्षेवर सध्या लक्ष केंद्रीत केलेले आहे. या परीक्षेला ९.५३ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

JEE: Another opportunity for students in flood-prone areas? | जेईई : पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना आणखी एक संधी?

जेईई : पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना आणखी एक संधी?

Next

- एस. के. गुप्ता
नवी दिल्ली : पूरग्रस्त भागात असलेल्या ज्या परीक्षा केंद्रांवर परीक्षा होऊ शकणार नाही त्या केंद्रावरील विद्यार्थ्यांना नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून एक संधी देण्याचा विचार सुरु आहे. मात्र, जे परीक्षार्थी परीक्षा न देता काही बहाणा देत असतील अशांना संधी मिळणार नाही.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक डॉ. विनीत जोशी यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. ते म्हणाले की, जेईई मुख्य परीक्षेवर सध्या लक्ष केंद्रीत केलेले आहे. या परीक्षेला ९.५३ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गतवर्षी ही परीक्षा ८ टप्प्यात झाली होती. यंदा ती दोन सत्रात सलग सहा दिवस म्हणजे १२ टप्प्यात होणार आहे.
परीक्षा पुढे ढकलता येईल का?
नागपूर : विदर्भामधील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची जेईई-नीट परीक्षा पुढे ढकलता येईल का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी केंद्र व राज्य सरकारला केली आणि यावर मंगळवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. या परीक्षेला मंगळवारी सकाळी ९ वाजता प्रारंभ होणार आहे.

Web Title: JEE: Another opportunity for students in flood-prone areas?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.