कोची- केरळातल्या कोचीहून दिल्लीकडे जाणा-या विमानाला सुरक्षेच्या कारणास्तव दोन तास उशिरानं कोची विमानतळावरून उड्डाण करावं लागलं आहे. जेट एअरवेजचं विमान 9W 825 हे सुरक्षेच्या कारणास्तव दोन तास रोखून धरण्यात आलं होतं. त्यादरम्यान विमानतळ अधिका-यांकडून विमानाच्या सुरक्षेच्या फेरआढावाही घेण्यात आला. त्यानंतर दुपारी 2 वाजता विमान रवाना करण्यात आलं.सुरक्षेच्या कारणास्तव कोचीहून दिल्लीकडे जाणा-या विमानाला दोन तास कोची विमानतळावर थांबवून ठेवण्यात आलं होतं, अशी माहिती जेट एअरवेजच्या अधिका-यांनी दिली आहे. यावेळी विमानतळावरील अधिका-यांनीही जेट एअरवेज कंपनीच्या सुरक्षा पाहणीत सहकार्य केलं आहे. परंतु विमान दोन तास रोखून ठेवण्याचं कारण अद्यापही स्पष्ट करण्यात आलेलं नाही.गेल्या काही दिवसांपूर्वी जेट एअरवेजच्या विमानात बॉम्ब ठेवल्याचे सांगून विमान अपहरणाची धमकी देणाऱ्या बिरजू सल्ला याच्या चौकशीमधून अनेक खुलासे झालेत. गुजरातमधील अब्जाधीश जवाहिर असणाऱ्या बिरजू याला विमान कंपनीत काम करत असलेल्या प्रेय0सीसाठी रॉयल एअरलाइन्स सुरू करायची होती. 37 वर्षीय बिरजू सल्ला याची सध्या अहमदाबाद येथे क्राइम ब्रँचकडून चौकशी सुरू आहे. त्यावेळी बिरजू याने आपल्याला विमान कंपनीत काम करत असलेल्या प्रेयसीसाठी विमान कंपनी सुरू करायची असल्याचे सांगितले.बिरजू याला याआधीही यावर्षीच्या जुलै महिन्यात विमान अपहरणविरोधी कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. विशेष म्हणजे नागरी विमान वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी सांगितले होते की, या व्यक्तीला ह्यनो फ्लायह्ण श्रेणीत टाकण्यात यावे.मुंबईहून दिल्लीला जाणारे जेट एअरवेजचे विमान रविवारी पहाटे अपहरण आणि बॉम्बच्या धमकीनंतर तातडीने अहमदाबाद येथे विमानतळावर उतरविण्यात आले होते. या विमानात ११५ प्रवासी व चालक दलाचे ७ कर्मचारी होते. विमानाच्या स्वच्छतागृहात उर्दू व इंग्रजीत लिहिलेली एक चिठ्ठी मिळाली. ह्यविमानात १२ अपहरणकर्ते आहेत व विमानाच्या सामान ठेवण्याच्या जागेत बॉम्ब ठेवले आहेत. विमान कुठेही न थांबविता थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घेऊन जावे, अन्यथा बॉम्बचो स्फोट केले जातील,ह्ण अशी धमकी त्या चिठ्ठीत होती.या विमानाने मुंबईहून रविवारी पहाटे २.५५ वाजता उड्डाण केले होते. विमानात चिठ्ठी सापडताच वैमानिकाने ताबडतोब जवळच असलेल्या अहमदाबाद विमानतळाच्या वाहतूक नियंत्रकांशी संकर्प साधला. हे विमान (९ डब्ल्यू ३३९) सोमवारी पहाटे ३.४५ वाजता अहमदाबाद विमानतळावर उतरविण्यात आले होते. तेथे सर्व प्रवाशांना खाली उतरवून त्यांची कसून चौकशी करण्यात आली. याबाबत माहिती देताना सुरक्षा ब्यूरोच्या एका अधिका-याने सांगितले की, सर्व प्रवाशांची झडती घेतल्यानंतर काहीही सापडले नाही. या विमानतळावर ६ तासांपेक्षा अधिक वेळ तपासणी आणि अन्य कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सकाळी १०.३० वाजता हे विमान दिल्लीसाठी रवाना झाले होते.उर्दू आणि इंग्रजी भाषेत लिहिलेल्या या चिठ्ठीत अल्लाह इज ग्रेट असे लिहिले होते. यात असा इशाराही दिला होता की, जर आपण विमानाच्या लँडिंगचा प्रयत्न कराल, तर तुम्हाला विमानात लोकांच्या मृत्यूचे चित्र दिसेल. याला थट्टा समजू नका. सामान ठेवण्याच्या जागी बॉम्ब आहेत. विमानाच्या लँडिंगचा प्रयत्न केला, तर स्फोट होईल. त्यानंतर विमान अपहरणाची धमकी देणाऱ्या बिरजू सल्ला याला अटक करण्यात आली होती. तो गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील राजुला येथील रहिवासी आहे.