दुमका: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी झारखंड सरकारनं बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनला (बीआरओ) दिलेली परवानगी नाकारली आहे. लडाखमधील रस्त्याच्या कामासाठी दुमका भागात कामगारांची निवड प्रक्रिया सुरू करण्यात यावी, यासाठी झारखंडमधल्या हेमंत सोरेन सरकारनं परवानगी दिली होती. मात्र आता ही परवानगी मागे घेण्यात आल्यानं लडाख भागातील रस्ता पूर्ण कसा करायचा, असा प्रश्न सरकारपुढे निर्माण झाला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता महानगरांमध्ये कामासाठी गेलेले झारखंडमधले अनेक मजूर घरी परतले आहेत. त्यांच्या मदतीनं लडाखमधल्या रस्त्याचं काम करण्याचा मोदी सरकारचा मानस होता. यासाठी सोरेन सरकारनं सीमावर्ती भागातील रस्ते बांधणीचं काम करणाऱ्या बीआरओ आणि केंद्रीय दलांना मंजुरीदेखील दिली होती. गेल्याच महिन्यात सोरेन सरकारनं परवानगी दिल्यानंतर बीआरओनं मजुरांची निवड प्रक्रिया सुरू करण्याच्या दृष्टीनं पावलं टाकण्यास सुरुवात केली. मात्र आता सोरेन सरकारनं बीआरओचे संचालक (नियोजन) सौरभ भटनागर यांना परवानगी रद्द करत असल्याचं पत्र पाठवलं. 'टाईम्स ऑफ इंडिया'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.सोरेन सरकारनं बीआरओच्या संचालकांना २९ मे रोजी लिहिलेल्या पत्रात कोरोना संक्रमणाची भीती आणि लॉकडाऊनचा उल्लेख आहे. 'कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि लॉकडाऊन वाढण्याची शक्यता पाहता आम्ही तुम्हाला देत असलेली परवानगी तातडीनं रद्द करत आहोत,' असं झारखंड सरकारनं पत्रात म्हटलं आहे. लडाख भागात चीनला लागून असलेल्या भागात रस्ता तयार करण्यासाठी ११ हजार मजुरांची आवश्यकता आहे.लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे केजरीवालांच्याही पुढे; पण...खबरदारी घ्या, सूचनांचं पालन करा, वादळानंतर पर्यावरणमंत्र्यांचं जनतेला आवाहन...तर ठाकरे सरकार कोणीही वाचवू शकणार नाही; अमित शहांचं सूचक विधान
आता कसा पूर्ण करायचा लडाखमधला रस्ता?; झारखंडचा मोदी सरकारला मोठा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 4:47 PM