जिया हो बिहार के लाला... 98 वर्षीय राजकुमार वैश्य यांना एमएची पदवी प्रदान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 08:47 PM2017-12-26T20:47:53+5:302017-12-27T15:34:53+5:30

पटना येथील नालंदा मुक्त विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी गेल्या सप्टेंबर महिन्यात वयाच्या 98 व्या वर्षी एमए (अर्थशास्त्र)च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या राजकुमार वैश्य यांना एमएची पदवी प्रदान करण्यात आली. 

Jia Ho Lala Lala ... 98 years old Rajkumar Vaishhee is conferred the title of MA | जिया हो बिहार के लाला... 98 वर्षीय राजकुमार वैश्य यांना एमएची पदवी प्रदान

जिया हो बिहार के लाला... 98 वर्षीय राजकुमार वैश्य यांना एमएची पदवी प्रदान

Next
ठळक मुद्देनालंदा मुक्त विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ मोठ्या दिमाखात पार पडलाराजकुमार वैश्य यांना एमएची पदवी प्रदान करण्यात आली. नेहमी प्रयत्न करत राहा, तरुण पिढीला सल्ला

बिहार : पटना येथील नालंदा मुक्त विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी गेल्या सप्टेंबर महिन्यात वयाच्या 98 व्या वर्षी एमए (अर्थशास्त्र)च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या राजकुमार वैश्य यांना एमएची पदवी प्रदान करण्यात आली. 
नालंदा मुक्त विद्यापीठात मंगळवारी राजकुमार वैश्य यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांना स्नातकोत्तर पदवी देण्यात आली. पदवी स्वीकारण्यासाठी राजकुमार वैश्य हे व्हिलचेअरवर बसून आले होते. त्यांना बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी राजकुमार वैश्य यांनी तरुण पिढीला नेहमी प्रयत्न करत राहा, असा सल्ला दिला. 




शिक्षणाला कोणत्याही वयाची अट नाही, फक्त शिकण्याची जिद्द असावी लागते. अशीच जिद्द 98 वर्षीय राजकुमार वैश्य यांच्यात पाहयला मिळते. वयाचा इतका काळ लोटला तरीही त्यांचा शिक्षणातला रस किंचितही कमी झाला नाही.  राजकुमार वैश्य यांचा जन्म बरेलीत 1 एप्रिल 1920 रोजी झाला. त्यांनी आगरा विद्यापीठातून 1938 साली स्नातक पदवी प्राप्त केली. त्यानंतर ब-याच वर्षांनंतर त्यांनी  स्नातकोत्तर पदवी प्राप्त करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही टाकण्यात आले आहे.

Web Title: Jia Ho Lala Lala ... 98 years old Rajkumar Vaishhee is conferred the title of MA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.