- सिकंदर अनवारेदासगाव : महाड खाडीपट्टा विभागात सावित्री नदीमध्ये अनेक गावांत महाराष्ट्र सागरी विकास विभागाकडून छोट्या जेट्टी बांधण्यात आल्या आहेत. या जेट्टी बांधताना कामे निकृष्ट पद्धतीने होत असल्याने अल्पावधीतच त्या नादुरु स्त होत आहेत, अशाच प्रकारे वराठी गावात बांधलेली जेट्टीदेखील दोन वर्षांतच तुटली आहे. तडे गेलेल्या या जेटीकडे लक्ष देण्यास सागरी विकास विभागाला वेळ नसल्याने दोन वर्षांपासून वापराविना पडून आहे. यामुळे स्थानिक मच्छीमार आणि ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.महाड तालुक्यात सावित्रीलगत असलेल्या खाडीपट्टा विभागातील गावांमधून स्थानिक ग्रामस्थ या खाडीवर व्यवसाय करून गुजराण करतात. यामध्ये वाळू उत्खनन, मासेमारी यांचा समावेश आहे, याकरिता महाराष्ट्र बंदर विकास विभागाने छोट्या जेट्टी बांधून दिल्या आहेत. यामध्ये वराठी, जुई, सव, तेलंगे, गोठे, दासगाव, या गावांचा समावेश आहे. पूर्वी बाणकोट खाडीतून सुटणाऱ्या बोटी वराठी, दासगाव या ठिकाणी थांबत असत. दासगाव प्रमाणेच वराठी हेदेखील एक बंदर होते. ग्रामस्थ छोट्या होड्यातून सावित्रीत मासेमारी करतात, तर अनेक जण वाळू व्यवसायही करतात. पिढ्यान्पिढ्याच्या व्यवसायाला प्रदूषणामुळे अवकळा लागली आहे.प्रदूषित पाण्याने मासेमारीचे प्रमाण कमी झाली आहे, असे असले तरी आजही अनेक जण कुटुंबासाठी मासेमारी करतात, याकरिता महाराष्ट्र सागरी मंडळाने सावित्री खाडीलगत छोट्या जेट्टी बांधून दिल्या आहेत. यापैकीच वराठी गावातदेखील जेट्टी बांधण्यात आली आहे. दोन ते तीन वर्षांपूर्वी ही जेट्टी बांधल्याचे येथील ग्रामस्थ नीलेश लोखंडे यांनी सांगितले. मात्र, निकृष्ट बांधकामामुळे ही जेट्टी अवघ्या दोन वर्षांतच तुटली आहे. यामुळे या जेट्टीवरून चालताना धोका निर्माण झाला आहे.- वराठी गावात महाराष्ट्र सागरी मंडळाने बांधलेल्या या जेट्टीला मधोमध भला मोठा तडा गेला आहे, यामुळे ही जेट्टी केव्हाही कोसळू शकते. या जेट्टीवरून चालताना तडा गेलेल्या जागेतून पाय अडकून पडण्याचा धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.- उधाणाचे पाणी जेट्टीवर पाणी असल्यास जेट्टीला पडलेल्या चिरा दिसून येत नाहीत, यामुळे स्थानिकांना अपघात होण्याची शक्यता आहे. या बाबत सागरी मंडळाच्या अधिकाºयांशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.पूर्वीच्या जलवाहतुकीच्या मार्गावरच वराठी या बंदरात सागरी मंडळाने दोन वर्षांपूर्वी जेट्टी बांधली होती. निकृष्ट कामामुळेच या जेट्टीची अल्पावधीतच दुरवस्था झाली होती. जेट्टीला पडलेल्या भेगांमुळे स्थानिक ग्रामस्थांना ये-जा करणे धोक्याचे बनले आहे.- नीलेश लोखंडे, वराठी ग्रामस्थ
वराठी गावातील जेट्टीची दुरवस्था; उधाणाचे पाणी आल्यास अपघाताचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 11:54 PM