जेएनयू निवडणुकीत पुन्हा फडकला लाल झेंडा, युनायटेड लेफ्टने जिंकल्या चारही जागा, गीता कुमारी JNUSU अध्यक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 07:43 AM2017-09-10T07:43:41+5:302017-09-10T08:06:59+5:30
देशातील आणि जगातील अग्रगण्य युनिव्हर्सिटी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थी संघटना निवडणुकीत युनायटेड लेफ्टने चारही जागा जिंकल्या आहेत.
नवी दिल्ली, दि. 10 - देशातील आणि जगातील अग्रगण्य युनिव्हर्सिटी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थी संघटना निवडणुकीत युनायटेड लेफ्टने चारही जागा जिंकल्या आहेत. युनायटेड लेफ्टच्या गीता कुमारी हिने अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली असून तिला एकूण 1506 मतं मिळाली. तिच्याशिवाय इतर तीन जागा देखील डाव्या संघटनांनीच जिंकल्या. गीता कुमारी ही एआयएसए या विद्यार्थी संघटनेकडून निवडणूक लढवत होती.
AISA, SFI आणि DSF या तीनही डाव्या संघटनांनी यावर्षी एकत्र निवडणूक लढवली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनेने युनायटेड लेफ्टला सर्व जागांवर कडवी टक्कर दिली, पण त्यांचा दारूण पराभव झाला. विद्यार्थी परिषदेकडून अध्यक्षपदाची निवडणूक लढवणारी उमेदवार निधी त्रिपाठी दुस-या क्रमांकावर राहिली. दुसरीकडे कॉंग्रेसची एनएसयूआय संघटनेला अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेरच्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
प्रेसिडेंट-
गीता कुमारी- (लेफ्ट यूनिटी)- 1506
निधि त्रिपाठी- (एबीवीपी)- 1042
शबाना अली- (बाप्सा)- 935
वाइस प्रेसिडेंट-
सिमोन ज़ोया खान (लेफ्ट यूनिटी)- 1876
दुर्गेश कुमार (एबीवीपी)- 1028
सुबोध कुमार (बाप्सा)- 910
जनरल सेक्रेटरी-
डुग्गीराला श्रीकृष्णा- (लेफ्ट यूनिटी)- 2082
निकुंज मकवाना- (एबीवीपी)- 975
करम बिद्यनाथ खुमान- (बाप्सा)- 854
जॉइंट सेक्रेटरी-
शुभांशु सिंह- (लेप्ट यूनिटी)- 1755
पंकज केशरी- (एबीवीपी)- 920
विनोद कुमार- (बाप्सा)- 862