अडीच दिवसांचा गणपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:27 AM2018-05-20T00:27:22+5:302018-05-20T00:27:22+5:30

सोशल मीडियातून येडियुरप्पांची खिल्ली

Jokes and memes abound on social media Yeddyurappa resigns as Karnataka CM | अडीच दिवसांचा गणपती

अडीच दिवसांचा गणपती

googlenewsNext

मुंबई : विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यापूर्वीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची नामुष्की ओढावलेले बी. एस.येडियुरप्पा यांची सोशल मीडियातून भरपूर खिल्ली उडविण्यात आली. त्याचवेळी भाजपाप्रेमींनी काँग्रेस, राहुल गांधी यांची खेचण्याचा प्रयत्न केला.
येडियुरप्पा यांना दोन पोलीस उचलून नेत असून बाजूला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार त्या पोलिसांना मदत करीत असल्याचे चित्र व्हायरल झाले. ‘अडीच दिवसांचा गणपती’ असे कॅप्शन या फोटोला देण्यात आले. ‘येडी ने फुलाया फुल... फुल को ले गया कुमार...!, अशी गमतीशीर प्रतिक्रियादेखील आली. ‘हातातोंडाशी आलेलं पिक वाया गेल्यावर शेतकऱ्याला कसं वाटतं हे आता भाजपाला कळलं असेल, अशी खोचक टिप्पणीही आली.
‘येडियुरप्पा - अनिल कपूरनंतर सगळ्यात कमी दिवस राहिलेली मुख्यमंत्री’ अशी चेष्टाही करण्यात आली. ‘नायक’ चित्रपटात अनिल कपूरला एक दिवसाचा मुख्यमंत्री दाखविले होते हा संदर्भ त्यात होता. ‘फुकाच्या ठरल्या भाजपाच्या गप्पा, तोंडावर पडले येडियुरप्पा’, हा नारा फिरत होता. ‘वाटलेले पेढे परत घेण्यासाठी भाजपाच्या कार्यालयात मेळावा घेणार’ अशी कल्पनाशक्तीही लढविण्यात येत होती.
विश्वेश्वरैय्यानंतर राहुल गांधींसमोर मोठे आव्हान. आता म्हणावे लागेल, हरदनहळ्ळी दोड्डेगौडा कुमारस्वामी’ अशी राहुल यांची विकेट घेऊ पाहणारी प्रतिक्रियाही चर्चेत होती.

Web Title: Jokes and memes abound on social media Yeddyurappa resigns as Karnataka CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.