जे.पी. नड्डांची लवकरच नवी टीम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 04:42 AM2020-07-08T04:42:27+5:302020-07-08T04:43:11+5:30
भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना १५-१६ जुलैच्या आधी नवीन टीम मिळणार आहे. मंत्रिमंडळाची फेररचना नंतर होईल.
नवी दिल्ली : भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना १५-१६ जुलैच्या आधी नवीन टीम मिळणार आहे. मंत्रिमंडळाची फेररचना नंतर होईल.
नड्डा यांना उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि २५ मोर्चे व विभागांना ‘नवे चेहरे’ मिळतील. पक्षाचे मोर्चे आणि विभागांना नवी दिशा देण्यावर नड्डा यांचा भर असेल. आठ सरचिटणीसांपैकी किमान दोघांची (त्यात एक डॉ. अनिल जैन) जागा दुसऱ्यांना दिली जाईल. महाराष्ट्राची जबाबदारी असलेले दुसरे एक सरचिटणीस मनोज पांडेय यांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात होऊ शकतो. माजी रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांना नवे सरचिटणीसपद दिले जाऊ शकते. युवा मोर्चाच्या अध्यक्ष पूनम महाजन यांची जबाबदारी तरुण चेहºयाला दिली जाऊ शकते. महिला मोर्चाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्यावर नवी जबाबदारी दिली जाईल. महाराष्ट्रातील विजय चौथाईवाले यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण स्वरूपातील उच्च तंत्रज्ञान परराष्ट्र कामकाज विभाग बळकट केला जाईल.