सुटीचा आनंद घेण्यास न्यायाधीश झाले मोकळे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:38 AM2018-05-20T00:38:59+5:302018-05-20T00:38:59+5:30
न्या. सिक्री : ...रविवारी पुन्हा कोर्टात यावे लागू नये, अशी आशा आहे
नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये रंगलेल्या सत्तानाट्यात महत्वाची भूमिका बजावणारे नवी दिल्लीतील सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीशही निश्चिंतपणे सुटीचा आनंद घेण्यास मोकळे झाले. राज्यपालांनी येडियुरप्पा यांना सरकार स्थापनेसाठी पाचारण केल्यानंतर गुरुवारी पहाटेपर्यंत युक्तिवाद ऐकणाऱ्या न्या. एक. सिक्री, न्या. शरद बोबडे व न्या. अशोक भूषण यांच्या विशेष खंडपीठास शनिवारी सकाळी कोर्टात यावे लागले. निमित्त होते विधानसभा हंगामी अध्यक्ष म्हणून के. जी. बोपय्या यांच्या नियुक्तीस आव्हान देणारी याचिका. विश्वासदर्शक ठरावासाठी दुपारपासून अधिवेशन सुरु होणार असल्याने याचिका तातडीने निकाली करणे गरजेचे होते. ही याचिका फेटाळली गेल्याने अधिवेशनाचा मार्ग मोकळा झाला. हा निकाल दिल्यानंतर न्या. सिक्री वकिलांना मजेने म्हणाले की, आता रविवारी पुन्हा कोर्टात यावे लागणार नाही, अशी आशा आहे. आता आम्हाला सुटीचा आनंद मोकळेपणाने घेता येईल, अशी आहे. अगदीच नाईलाज झाला म्हणून हा त्रास द्यावा लागला, असे काँग्रेसचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल दिलगिरीच्या स्वरात म्हणाले.