नवी दिल्ली : देशाचे ४५वे सरन्यायाधीश म्हणून न्या. दीपक मिश्रा (६४) यांचा सोमवारी शपथविधी झाला. राष्ट्रपती भवनात त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शपथ दिली. त्यांचा कार्यकाळ २ आॅक्टोबर २०१८पर्यंत आहे. सरन्यायाधीश जे. एस. खेहर हे रविवारी निवृत्त झाले.निर्भया बलात्कार व हत्या खटल्यात चार दोषींना देहदंडाची शिक्षा कायम करणाºया खंडपीठात मिश्रा यांचा समावेश होता. चित्रपटगृहांत राष्ट्रगीताचे गायन बंधनकारक करण्याचा आदेशही त्यांचाच. याकुब मेमनच्या फाशीची सुनावणी त्यांनी मध्यरात्री घेतली होती. प्रघातानुसार मिश्रा यांचे नाव सरन्यायाधीश खेहर यांनी गेल्या महिन्यात सरन्यायाधीश पदासाठी सुचवले होते. शपथविधीला उपराष्ट्रपती एम. व्यंकया नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद व अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते.
न्या. दीपक मिश्रा नवे सरन्यायाधीश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 4:32 AM