भोपाळ: माजी खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ट्विटर बायोमधून भाजपाचा उल्लेख हटवल्याची चर्चा सकाळपासून सुरू होती. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबतच मतभेद होत असल्यानं सिंधिया यांनी ट्विटरवरून भाजपाचा उल्लेख काढून टाकल्याचं बोललं जात आहे. याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानं अखेर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ट्विट करून यावर भाष्य केलं.चुकीच्या बातम्या सत्यापेक्षा वेगानं पसरतात, असं ट्विट सिंधिया यांनी केलं. या माध्यमातून त्यांनी राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. सिंधिया यांनी मार्चमध्ये काँग्रेसला रामराम करत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत २२ समर्थक आमदारांनीही पक्ष सोडल्यानं राज्यातील काँग्रेस सरकार कोसळलं. २० मार्चला कमलनाथ यांचं सत्ता कोसळल्यानंतर २३ मार्चला शिवराज सिंह चौहान यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
ट्विटरवरून 'भाजपा' हटवणाऱ्या सिंधियांनी मौन सोडले; एका वाक्यात अफवांवर बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2020 8:05 PM