प्रेरणादायी! इंजिनिअर झाला वेटर, विकली चित्रपटाची तिकिटं; ६ वेळा नापास, ७ व्या प्रयत्नात IRS

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 01:50 PM2024-06-03T13:50:07+5:302024-06-03T13:50:46+5:30

एका छोट्या गावात जन्मलेल्या जयगणेश यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमकुवत होती. त्यांचे वडील एका कारखान्यात काम करत होते. ते कसातरी कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकत होते.

k jaiganesh 2018 air 156 belonged to poor family decided to change lifestyle | प्रेरणादायी! इंजिनिअर झाला वेटर, विकली चित्रपटाची तिकिटं; ६ वेळा नापास, ७ व्या प्रयत्नात IRS

प्रेरणादायी! इंजिनिअर झाला वेटर, विकली चित्रपटाची तिकिटं; ६ वेळा नापास, ७ व्या प्रयत्नात IRS

प्रबळ इच्छाशक्ती असेल तर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे. वेल्लोर जिल्ह्यातील विनवमंगलम नावाच्या एका छोट्या गावात जन्मलेल्या जयगणेश यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमकुवत होती. त्यांचे वडील एका कारखान्यात काम करत होते. ते कसातरी कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकत होते.

जयगणेश हे त्यांच्या कुटुंबातील मोठा मुलगा होते. अशा परिस्थितीत घर चालवण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आली. त्यांना आपल्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढायचं होतं. ते अभ्यासात खूप हुशार होते. घरची आर्थिक परिस्थिती कमकुवत असूनही ते खचले नाहीत. आपल्या करिअरला आणि आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी त्यांनी खूप अभ्यास केला. 

के जयगणेश यांना बारावी बोर्डाच्या परीक्षेत जवळपास ९२ टक्के गुण मिळाले होते. यानंतर शिष्यवृत्तीच्या मदतीने त्यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगसाठी प्रवेश घेतला. इंजिनीअर झाल्यानंतर त्यांनी खासगी नोकरी सुरू केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्याप्रमाणेच इतर अनेक कुटुंबही त्यांच्या आर्थिक परिस्थितीशी झगडत आहेत. आपल्या कुटुंबाला आणि इतरांना मदत करण्यासाठी त्यांनी इंजिनिअरची नोकरी सोडली आणि कलेक्टर होण्याची तयारी सुरू केली.

सिनेमा हॉलमध्ये बिलिंग ऑपरेटर म्हणून केलं काम 

के जयगणेश यांनी यूपीएससी परीक्षेची माहिती गोळा केली. त्यानंतर चेन्नई येथील कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. तेथे फी भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांचा खर्च भागवण्यासाठी आणि UPSC कोचिंग फी भरण्यासाठी त्यांनी सिनेमा हॉलमध्ये बिलिंग ऑपरेटर म्हणून काम करायला सुरुवात केली. तेथे त्यांना दरमहा तीन हजार रुपये पगार मिळत असे. २००४ मध्ये ते यूपीएससी परीक्षेत नापास झाले. यानंतर त्यांनी सिनेमा हॉलच्या नोकरीचा राजीनामा दिला.

कोचिंग फीसाठी बनले वेटर 

यूपीएससीची परीक्षा सोपी नाही हे त्यांना समजलं होतं. याची तयारी करण्यासाठी अभ्यासाचे तास वाढवावे लागतील. पण नोकरी सोडून फक्त अभ्यास करायचा पर्याय त्यांच्याकडे नव्हता. त्यामुळे ते एका रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम करू लागले. त्यामुळे त्यांना अभ्यासासाठी जास्त वेळ मिळू लागला. पहिल्या दोन प्रयत्नात जयगणेश यांना यूपीएससी प्रिलिम्स परीक्षाही पास करता आली नाही. त्यानंतर त्यांनी कोचिंग क्लासमध्ये समाजशास्त्र शिकवायला सुरुवात केली.

सलग ६ वेळा नापास 

UPSC नागरी सेवा परीक्षेत ते सलग ६ वेळा नापास झाले. असं असूनही त्यांनी हार मानली नाही. ते त्यांच्या बाजूने तयारी करत राहिले. त्यांच्या मेहनतीचं फळ होतं की UPSC परीक्षेच्या ७ व्या प्रयत्नात ते UPSC प्रिलिम्स, UPSC Mains आणि UPSC मुलाखतीत यश मिळवू शकले. यामध्ये ते १५६ व्या रँकसह आयआरएस अधिकारी बनले. सध्या ते चेन्नई, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी प्रदेशात एडिशनल सीआयटी (OSD) पदावर कार्यरत आहेत.
 

Web Title: k jaiganesh 2018 air 156 belonged to poor family decided to change lifestyle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.