संविधान बचाओ म्हणणारा कन्हैया कुमार राष्ट्रगीतच विसरला, शेवटच्या दोन ओळीत घोळ घातला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 09:14 AM2020-02-28T09:14:38+5:302020-02-28T09:19:29+5:30
Kanhaiya Kumar : कन्हैया कुमारच्या नेतृत्वात काल पाटणा येथे ‘संविधाान बचाओ नागरिकता बचाओ’ सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ही सभा अनेक गोष्टीमुळे वादग्रस्त ठरली.
पाटणा - जेएनयूमधील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष आणि सीपीआय नेता कन्हैया कुमार याने सध्या केंद्रातील सरकार आणि नरेंद्र मोदींविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. दरम्यान, कन्हैया कुमारच्या नेतृत्वात काल पाटणा येथे ‘संविधाान बचाओ नागरिकता बचाओ’ सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ही सभा अनेक गोष्टीमुळे वादग्रस्त ठरली. धक्कादायक बाब म्हणजे या सभेच्या शेवटी भाषण देण्यास उठलेल्या कन्हैया कुमारने उत्साहाच्या भारात राष्ट्रगीताने आपल्या भाषणाची सुरुवात केली. मात्र स्वत: कन्हैया कुमारच राष्ट्रगीतातील शेवटच्या ओळी विसरला. ही बाब चर्चेचा विषय ठरली.
त्याचे झाले असे की, कन्हैया कुमारने सभेला उपस्थित असलेल्या लोकांना उभे राहून राष्ट्रगीत गाण्याचे आवाहन केले. त्यानंतर राष्ट्रगीत गाण्यास सुरुवात केली. मात्र राष्ट्रगीतातील शेवटच्या दोन ओळींमध्ये जन गण मंगलदायक जय है ऐवजी कन्हैयाने जन गण मण गायले.
दरम्यान, कन्हैया कुमारच्या नेतृत्वात काल पाटणा येथे आयोजित करण्यात आलेली ‘संविधाान बचाओ नागरिकता बचाओ’ सभा या व्यतिरिक्तही इतर अनेक कारणांमुळे वादग्रस्त ठरली. कन्हैयाचे भाषण सुरू होण्यापूर्वी सहा-सात वर्षांच्या मुलाने देशातील सध्याच्या परिस्थितीबाबत चार ओळी ऐकवल्या. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात ‘नरेंद्र मोदी मुर्दाबाद’ अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर कन्हैया कुमारने या मुलाला आपल्या जवळ बोलावून त्याला आलिंगण दिले.
संबंधित बातम्या
बिहारमध्ये जन-गन-मन यात्रेवर 8 वेळा दगडफेक अन् आता कन्हैया कुमारवर फेकली चप्पल
तरुणांना अतिरेकी प्रवाहात ढकलण्याचं 'हे' कारस्थान; शिवसेनेने केली अमित शहांची पाठराखण
जेएनयूला 'व्हॉट्सअॅप विद्यापीठ' बनवण्याचा प्रयत्न : कन्हैया कुमार
कन्हैया कुमारच्या या सभेत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी हेसुद्धा सहभागी झाले होते. त्यांनी एनआरसी आणि एनपीआरची तुलना नथुराम गोडसेने महात्मा गांधींवर झाडलेल्या तीन गोळ्यांशी केली.