Kargil Vijay Diwas : नन्हा मुन्ना राही, कारगिल युद्धातील पराक्रमी सिपाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 09:08 AM2018-07-26T09:08:37+5:302018-07-26T10:05:31+5:30

Kargil Vijay Diwas : फरीदाबादच्या कांसापूर येथील रहिवासी असलेल्या मनजीत यांनी कारगिलच्या युद्धात पाकिस्तानशी लढताना पराक्रम गाजवला होता.

Kargil Vijay Diwas: About Kargil war 1999 hero indian army solider manjeet singh | Kargil Vijay Diwas : नन्हा मुन्ना राही, कारगिल युद्धातील पराक्रमी सिपाही

Kargil Vijay Diwas : नन्हा मुन्ना राही, कारगिल युद्धातील पराक्रमी सिपाही

Next

नवी दिल्ली - कारगिल युद्धांच्या आठवणींना आज 19 वर्षे पूर्ण होत आहेत. आजच्याच दिवशी म्हणजे 26 जुलै 1999 साली भारतीय सैन्याने कारगिलमध्ये बर्फाळ जमिनीवर तिरंगा फडकवत पुन्हा एकदा पाकिस्तानला धूळ चारली होती. 1999 मध्ये 18000 फूट उंचीवर पाकिस्तानच्या कूटनितीला भारतीय सैन्यांतील बहादूर जवानांनी आपल्या बलिदानाने उत्तर दिले. तब्बल अडीच महिने सुरू राहिलेल्या या युद्धात 527 जवानांना वीरमरण आले होते. यापैकीच एक जवान म्हणजे मनजीत सिंग. 

फरीदाबादच्या कांसापूर येथील रहिवासी असलेल्या मनजीत यांनी कारगिलच्या युद्धात पाकिस्तानशी लढताना पराक्रम गाजवला होता. तसेच ते कारगिलमध्ये शहीद झालेले सर्वात कमी ते वयाचे जवान होते. एका शेतकरी कुटुंबात शहीद मनजीत सिंग यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण घेत असतानाच देशाप्रती प्रेम असल्याने देशसेवेसाठी सैन्यात भरती होण्याची त्यांची इच्छा होती. त्यांच्या या इच्छेसाठी त्यांचे वडील गुरचरण सिंग यांनी त्यांना 1998 मध्ये सैन्यात भरती केलं. त्यानंतर साधारण दीड वर्षांनी मनजीत यांची ड्यूटी कारगिलसाठी लावण्यात आली. 7 जून 1999 रोजी पाकिस्तानशी दोन हात करताना मनजीत सिंग हे शहीद झाले. 

मनजीत यांच्या नातेवाईकांनी अभिमानाने त्यांना सैन्यात भरती केल्याच सांगत त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. तसेच अशाप्रकारे ते लवकर सोडून जातील असा विचार ही केला नसल्याचं त्यांनी म्हटलं. कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांपैकी मनजीत हे सर्वात लहान वयाचे जवान होते. वयाच्या 17 व्या वर्षी ते सैन्यात भरती झाले. तर त्यानंतर अवघ्या दीड वर्षांनी मनजीत युद्धात शहीद झाले. 
 

Web Title: Kargil Vijay Diwas: About Kargil war 1999 hero indian army solider manjeet singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.