Karnataka Floor Test: चाचणी ते निकाल... 'असा' ठरेल कर्नाटकातील 'नाटका'चा नायक!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2018 10:34 AM2018-05-19T10:34:05+5:302018-05-19T10:34:05+5:30

आज कर्नाटकात घडतील या महत्त्वपूर्ण घडामोडी.

karnataka assembly all set for trust vote | Karnataka Floor Test: चाचणी ते निकाल... 'असा' ठरेल कर्नाटकातील 'नाटका'चा नायक!

Karnataka Floor Test: चाचणी ते निकाल... 'असा' ठरेल कर्नाटकातील 'नाटका'चा नायक!

Next

बेंगलोर- कर्नाटक विधानसभा निवडणूक व त्यानंतर आलेल्या निवडणुकीच्या निकालानंतर कर्नाटकमधील राजकीय नाट्य दिवसेंदिवस चांगलं रंगत आहे. कर्नाटक निवडणुकीत कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. पण 104 आमदारांचं संख्याबळ असलेल्या भाजपाने राज्यपालांच्या निमंत्रणानंतर सत्ता स्थापनेचा दावा केला. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण राज्यपालांच्या निर्णयावर आक्षेप घेत काँग्रेस व जेडीएसने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी दिलेल्या निर्णयात आज बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आज भाजपा, काँग्रेस व जेडीएस बहुमत सिद्ध करणार आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर कर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

आज कर्नाटकात घडतील या महत्त्वपूर्ण घडामोडी.
1- सकाळी साडेदहा वाजता विधानसभेचं कामकाज सुरू होईल. कामकाज सुरू झाल्यानंतर नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सुरू होईल. आमदारांना आवश्यक व महत्त्वाची कागदपत्र घेऊन सभागृहात उपस्थित राहायला सांगण्यात आलं आहे. आमदारांचा शपथविधी सोहळा दुपारी 3 वाजेपर्यंत असेल.

2- संध्याकाळी चार वाजता सभागृहाचे हंगामी अध्य8 बहुमत चाचणीला सुरूवात करतील.

3. विधानभवनात उपस्थित सर्व आमदारांना जागा नेमून दिल्या जातील.

4. अध्यक्ष विश्वासदर्शक ठराव सभागृहात मांडतील. या विश्वास दर्शक ठरावावर आमदारांना मतदान करायचं आहे.

5. विश्वासदर्शक ठरावावर आमदारांच्या मतदानानंतर प्रत्येक रांगेनुसार शिरगणना होईल.

6. जर दोन्ही बाजूंना समसमान मतं पडली तर अध्यक्ष स्वतः मतदान करतील. अध्यक्षांचं मत निर्णायक राहिलं.

7. विश्वासदर्शक ठरावावर मतदान झाल्यानंतर मिळालेल्या मतानुसार येडियुरप्पाच मुख्यमंत्री राहणार कि नवे मुख्यमंत्री असणार हे ठरेल. 
 

Web Title: karnataka assembly all set for trust vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.