बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याबाबत कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी केली मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 05:29 PM2019-07-10T17:29:45+5:302019-07-10T17:32:33+5:30
काँग्रेस आणि जेडीएसच्या काही आमदारांनी बंडखोरी करत राजीनामे दिल्याने कर्नाटकमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे.
Next
बंगळुरू - काँग्रेस आणि जेडीएसच्या काही आमदारांनी बंडखोरी करत राजीनामे दिल्याने कर्नाटकमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. दरम्यान, या बंडखोर आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यांपैकी एकही राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही, अशी माहिती कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांनी दिली आहे.
Karnataka Assembly Speaker KR Ramesh Kumar: I have not accepted any resignation, I can't do it overnight like that. I have given them time on 17th. I'll go through the procedure and take a decision. #Karnatakapic.twitter.com/dsU1lhFmJ6
— ANI (@ANI) July 10, 2019
कर्नाटकमधील बंडखोर आमदारांच्या राजीनामानाट्याबाबत विचारणा केली असता विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांनी सांगितले की, ''मी एकही राजीनामा अद्याप स्वीकारलेला नाही. याबाबत मी घाईने निर्णय घेऊ शकत नाही. या आमदारांना मी 17 जुलैपर्यंतचा अवधी दिला आहे. त्यानंतर योग्य ती प्रक्रिया करून मी निर्णय घेईन.''
दरम्यान, मुंबईतील पवईमध्ये असलेल्या रेनेसन्स हॉटेलबाहेर हायव्होल्टेज ड्रामा सुरु आहे. काँग्रेस-जनता दलाचे (एस)बंडखोर आमदार रेनेसन्स हॉटेलमध्ये थांबले आहेत. या बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यासाठी काँग्रसचे 'संकटमोचक' म्हणून ओळखले जाणारे वरिष्ठ नेता डीके शिवकुमार या ठिकाणी आले आहे. त्यांना हॉटेलमध्ये पोलिसांनी जाऊ दिले नाही. त्यामुळे याठिकाणी तवाणाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
बंडखोर आमदारांसोबत चर्चा करण्यासाठी डीके शिवकुमार आज सकाळी मुंबईत दाखल झाले असून त्यांना भेटण्यास या आमदारांनी नकार दिला आहे. तसेच, या आमदारांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहून सुरक्षा मागविली आहे. त्यामुळे पोलिसांकडून डीके शिवकुमार यांना हॉटेलमध्ये जाण्यास मनाई करण्यात आली. तरीही सकाळपासून बंडखोर आमदारांची भेट घेण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यामुळे डीके शिवकुमार यांच्यासह राज्यातील काँग्रेस नेते मिलिंद देवरा आणि नसीम खान यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच, हॉटेल परिसरात संचारबंदी लागू केली आहे.