बंगळुरू- येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असून कर्नाटकात भाजपा सरकार पडले आहे.
LIVE:
- आम्हाला जनतेचं प्रेम मिळालं- येडियुरप्पा
- जनादेश भाजपाच्या बाजूनं, जनतेनं काँग्रेस-जेडीएसला नाकारलं- येडियुरप्पा
- मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या भाषणाला सुरुवात
- काँग्रेस आमदार प्रताप गौडा पाटील विधानसभेत पोहोचले
- येडियुरप्पा राजीनामा देऊ शकतात! राजीनाम्याबाबत भाजपा पक्षश्रेष्ठींना कळवल्याची माहिती
- हॉटेल गोल्ड फिंचमध्ये काँग्रेसचे दोन आमदार असल्याची माहिती. कर्नाटकचे डीजीपीसुद्धा हॉटेल गोल्ड फिंचमध्ये असल्याची माहिती.
- भाजपा आमदार सोम शेखर रेड्डी सभागृहात गैरहजर.
- काँग्रेसचे 76आमदार सभागृहात हजर. आमदार आनंद सिंह व प्रताप गौडा पाटील गैरहजर.
- हंगामी अध्यक्ष बोपय्याच करणार बहुमत चाचणी. सुप्रीम कोर्टाने केलं स्पष्ट.
- हंगामी अध्यक्ष बोपय्या यांच्या बाबतित निर्णय हवा असेल, तर बहुमत चाचणीला वेळ लागेल- सुप्रीम कोर्ट.
- विधानभवनात आमदारांचा शपथविधी सुरू.
- बहुमत चाचणीचं टेलिव्हिजनवर लाईव्ह प्रक्षेपण होणार- सुप्रीम कोर्ट
- बहुमत चाचणीसाठी सिद्धरामय्या विधानभवनात दाखल. चार वाजता होणार बहुमत चाचणी.
- बोपय्या यांची पहिल्यांदा परीक्षा, हंगामी अध्यक्षपद के.डी बोपय्या बंगळुरूतील विधानभवनात दाखल.
- विधान सौधाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात. चार वाजता होणार बहुमत चाचणी.
- शंभर टक्के बहुमत सिद्ध करणार असल्याचा येडियुरप्पांचा दावा, उद्यापासून कर्नाटकच्या जनतेला दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करणार. येडियुरप्पांची प्रतिक्रिया.
- काँग्रेसचे आमदार बंगळुरूत पोहचले.