कर्नाटक, गोव्यानंतर आता प. बंगालही भाजपचे ‘लक्ष्य, तृणमूल, सीपीएम, काँग्रेस फुटीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 06:29 AM2019-07-14T06:29:27+5:302019-07-14T06:29:36+5:30

कर्नाटक आणि गोवा या दोन राज्यांतील फोडाफोडी सुरू असतानाच भाजपचे आता पश्चिम बंगाल ‘लक्ष्य’ असल्याचे संकेत मिळत आहेत.

Karnataka, now after Goa Bengal's 'target of BJP', Trinamool, CPM, possibility of Congress split | कर्नाटक, गोव्यानंतर आता प. बंगालही भाजपचे ‘लक्ष्य, तृणमूल, सीपीएम, काँग्रेस फुटीची शक्यता

कर्नाटक, गोव्यानंतर आता प. बंगालही भाजपचे ‘लक्ष्य, तृणमूल, सीपीएम, काँग्रेस फुटीची शक्यता

Next

कोलकाता : कर्नाटक आणि गोवा या दोन राज्यांतील फोडाफोडी सुरू असतानाच भाजपचे आता पश्चिम बंगाल ‘लक्ष्य’ असल्याचे संकेत मिळत आहेत. तृणमूल, सीपीएम आणि काँग्रेसचे मिळून १०७ आमदार लवकरच भाजपमध्ये येणार असल्याचा दावा भाजप नेते मुकुल रॉय यांनी शनिवारी केला. असे झाल्यास विरोधकांच्या गोटातील अस्वस्थता पुन्हा एकदा चव्हाट्यावर येईल. तसेच ममतांच्या तृणमूल सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.
भाजपने यापूर्वीही तृणमूलचे आमदार आपल्या पक्षात येणार असल्याचा दावा केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूलचे ४० पेक्षा अधिक आमदार संपर्कात असल्याचे म्हटले होते. बंगाल भाजप प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी तृणमूलचे आमदार भाजपमध्ये सामील होणे सुरूच राहील, असे सांगितले होते.
>विद्यमान विधानसभेतील पक्ष बलाबल असे आहे...
तृणमूल 211
कॉँग्रेस 44
माकपा 26
भाजप 03
अन्य 10
>सीपीएम, काँग्रेस व तृणमूलचे मिळून १०७ आमदार आपल्या संपर्कात असून त्यांची यादी तयार आहे. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील.
- मुकुल रॉय, भाजप नेते
>लोकसभा निवडणुकीनंतर तृणमूलचे ५ आमदार व १०० नगरसेवक भाजपमध्ये गेले होते. आता आणखी आमदार त्याच मार्गावर गेल्यास तृणमूलला खिंडार पडेल.

Web Title: Karnataka, now after Goa Bengal's 'target of BJP', Trinamool, CPM, possibility of Congress split

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.