हनुमंतगड : काँग्रेस नेते, विशेषत: जवाहरलाल नेहरू यांच्याकडे दूरदृष्टी असती, तर कर्तारपूर जे आता पाकिस्तानात आहे, ते भारतात असते, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हनुमंतगड येथील सभेत केली. ते म्हणाले की, फाळणीनंतर काँग्रेस नेत्यांना स्वातंत्र्याची इतकी घाई झाली होती की, कर्तारपूरविषयी शीख समाजाच्या भावनांकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आले.काँग्रेसच्या तेव्हाच्या नेत्यांनी डोके शांत ठेवून आणि समजुतदारपणे निर्णय घेतले असते, तर भारतापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेले कर्तारपूर हे गाव पाकिस्तानात गेलेच नसते. गुरू नानक यांचे ते स्थान पाकिस्तानात जाणे, याहून अधिक दुर्दैवी काही असू शकत नाही. हनुमंतगढ हा भाग पंजाबच्या सीमेला लागून असून, त्यात ११ मतदारसंघ आहेत. तिथे शीख समाजाची मोठी वस्ती आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले. मोदी यांनी आपल्या भाषणात कर्तारपूरचा विषय जाणीवपूर्वक उपस्थित केला.
काँग्रेस नेत्यांना दूरदृष्टी नसल्याने कर्तारपूर पाकिस्तानात गेले : मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 4:43 AM