Karunanidhi Death Update : जेव्हा करुणानिधींनी 46 वर्षांनंतर बदलला आपली ओळख बनलेला काळा चष्मा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 08:37 PM2018-08-07T20:37:13+5:302018-08-08T06:08:02+5:30

Karunanidhi Death Update : करुणानिधी यांच्या व्यक्तिमत्वाबाबतची अशीच एक आठवण म्हणजे ते वापरत असलेला आणि त्यांची ओळख बनलेला काळा चष्मा. 

Karunanidhi Death Update: When Karunanidhi changed his black goggle after 46 years | Karunanidhi Death Update : जेव्हा करुणानिधींनी 46 वर्षांनंतर बदलला आपली ओळख बनलेला काळा चष्मा 

Karunanidhi Death Update : जेव्हा करुणानिधींनी 46 वर्षांनंतर बदलला आपली ओळख बनलेला काळा चष्मा 

Next

चेन्नई - तामिळनाडूच्याराजकारणातील दिग्गज व्यक्तिमत्त्व असलेल्या एम. करुणानिधी यांचे आज निधन झाले. मात्र राजकारण, चित्रपट आणि साहित्य क्षेत्रातील योगदानामुळे करुणानिधी कायम सर्वांच्या आठवणीत राहतील. करुणानिधी यांच्या व्यक्तिमत्त्वाबाबतची अशीच एक आठवण म्हणजे ते वापरत असलेला आणि त्यांची ओळख बनलेला काळा चष्मा. 

करुणानिधी यांनी मृत्यूपूर्वी वर्षभरापर्यंत एक विशिष्ट्य काळा चष्मा वापरला होता. सुमारे 46 वर्षे काळा चष्मा ही करुणानिधींच्या पेहरावाची ओळख बनली होती. राजकारण, लेखक, कवी अशा विविध भूमिका यशस्वीरीत्या बजावणाऱ्या करुणानिधी यांनी वयाच्या 94 व्या वर्षी काळ्या चष्म्याला अलविदा केले होते. त्यानंतर त्यांनी जर्मनीहून मागवलेला नवा चष्मा वापरण्यास सुरुवात केली होती.  

2017 साली करुणानिधी यांनी जेव्हा चष्मा बदलण्याचा निर्णय घेतला तेव्हा चेन्नईतील प्रसिद्ध विजय ऑप्टिकल्सवे नव्या फ्रेमसाठी संपूर्ण देशभरात शोध सुरू केला. अखेर सुमारे 40 दिवसांच्या शोधानंतर करुणानिधी यांच्यासाठी खास जर्मनीवरून चष्मा मागवण्यात आला. या चष्म्याची फ्रेम हलकी होती. त्याने करुणानिधी यांच्या 46 वर्षे जुन्या चष्म्याची जागा घेतली. मात्र हा नवा चष्मा करुणानिधी यांची फार काळ साथ देऊ शकला नाही.  

Web Title: Karunanidhi Death Update: When Karunanidhi changed his black goggle after 46 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.