मुंबई : माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचा कार्यकाळ काश्मीरसाठी एक प्रकारे सुवर्ण काळ ठरला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी तोच वारसा पुढे चालवतील, अशी काश्मिरी जनतेची अपेक्षा होती. मात्र, मोदी काश्मीरप्रश्नी सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप, जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी शुक्रवारी केला.आॅब्झर्वर रिसर्च फाउंडेशनने आयोजित केलेल्या परिसंवादात मुफ्ती यांनी काश्मीरप्रश्नाच्या विविध पैलूंवर भाष्य केले. मोदी काश्मिरी जनेतेच्या अपेक्षांची पूर्ती करू शकले नाहीत, असा दावा मुफ्ती यांनी केला. पाकिस्तान इमरान खानचे सरकार लष्कराच्या हातचे बाहुले असेल, तर ते चांगलेच आहे. त्यामुळे परिणामकारक चर्चा होईल. मात्र, काश्मीरचा मुद्दा दोन्हीकडे निवडणूक विषय बनतो. त्यामुळे २०१९च्या निवडणूक संपल्यावरच काश्मीरप्रश्नी हालचाल होईल, असे त्या म्हणाल्या.‘टीका करू नये’राफेल प्रकरणी भाजपा, समर्थकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहली. तसा संयम त्यांनी राम मंदिर निकालाबाबत दाखवावा. न्यायालयाकडे बोट दाखवत टीका करू नये, असे मुफ्ती म्हणाल्या.
काश्मीरप्रश्नी नरेंद्र मोदी अपयशी - मेहबुबा मुफ्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 6:21 AM