कथ्थक नृत्य, तबल्याची रंगली जुगलबंदी
By admin | Published: October 6, 2015 12:21 AM2015-10-06T00:21:23+5:302015-10-06T00:21:23+5:30
कथ्थक नृत्य, तबल्याची रंगली जुगलबंदी
Next
क ्थक नृत्य, तबल्याची रंगली जुगलबंदी-बारावा बहुभाषीय नाट्य महोत्सव (फोटो हार्ड कॉपीमध्ये आहे ..कॅप्शन..आचार्य पं. प्रशांत गायकवाड यांचा सत्कार करताना विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुरेश शर्मा, माजी कुलगुरू हरिभाऊ केदार, मधुप पांडेय, समाजसेवक उमेश चौबे व इतर मान्यवर.)नागपूर : ललिता कुंडू यांचे कथ्थक नृत्य व आचार्य पं. प्रशांत गायकवाड यांच्या तबलावादनाच्या जुगलबंदीने बारावा बहुभाषीय नाट्य महोत्सव रंगला. कला सागर नागपूरद्वारा या नाट्य महोत्सवाचे उद्घाटन विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुरेश शर्मा यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू हरिभाऊ केदार, विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाचे कार्यकारी प्रधानमंत्री मधुप पांडेय, कलासागरचे अध्यक्ष व ज्येष्ठ समाजसेवक उमेश चौबे उपस्थित हेाते. सीताबर्डी येथील श्री रामगोपाल माहेश्वरी सांस्कृतिक सभागृहात आयोजित या पाच दिवसीय महोत्सवाची सुरुवात शिववंदनेने झाली. दिल्ली येथील ललिता कुंडू यांच्या कथ्थक नृत्यावर आचार्य पं. प्रशांत गायकवाड यांच्या तबल्याची जुगलबंदी आकर्षण ठरले. यात उठाण, तोडे, गत, चक्रदार, तिहायी, नवका तिहायी आणि सवाल-जवाबद्वारे जुगलबंदीवर रसिकांनी भरभरून टाळ्यांचा प्रतिसाद दिला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कुंडू व पं. गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. अकोला येथील प्रा. डॉ.पी. आर. सुपळकर यांच्या गायनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले.