नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊननंतर काय यावर चर्चा करताना राज्यांनी कोणती काळजी घ्यावी यावरही सूचना केल्या. हळू हळू परंतू प्रत्यक्षात विविध भागात आर्थिक व्यवहार सुरु झाले आहेत. भविष्यात यामध्ये वेग येईल अशी आशा मोदी यांनी व्यक्त केली.
लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. यामुळे अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात परत जाण्याची सोय करण्यात येत आहे. मात्र, कोरानापासून गावांना लांब ठेवण्याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार असल्याचे मोदी म्हणाले. तसेच सहा फूट अंतर ठेवणे कमी झाले तर फार मोठे संकट उभे राहिल अशी भीतीही मोदी यांनी व्यक्त केली.
आपल्याला आता हे समजून घ्यावे लागेल की, कोरोनासोबतची लढाई आता जास्त स्पष्ट असेल. पुढे आपल्याला कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे, असेही मोदी म्हणाले. कोरोनाविरोधात लढण्यात भारताला यश मिळाले आहे. जगभरातून याची दखल घेतली गेली आहे. हे यश राज्यांचेही असल्याचे मोदी म्हणाले.
तर तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी ३१ मे पर्यंत ट्रेन सुरु न करण्याचा आणि विमाने देखील सुरु न करण्याची मागणी केली. कोरोनाला लांब ठेवायचे आहे. यामुळे तामिळनाडूमध्ये ३१ मे पर्यंत कोणालाही परराज्यातून येण्याची परवानगी देऊ नका असेही त्यांनी सांगितले.
तेलंगानाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनीदेखील प्रवासी रेल्वे सुरु न करण्याची विनंती केली. यामुळे कोरोना व्हायरस देशभरात पसरण्याचा धोका असल्याचे त्यांनी मोदींना सांगितले.
महत्वाच्या बातम्या...
पाकिस्तानची जिरली! भारतातून औषधांआडून 'या' वस्तूची तस्करी
Vidhan Parishad Election उद्धव ठाकरेंची संपत्ती किती? आज पहिल्यांदाच झाला खुलासा
धक्कादायक! इराणने स्वत:च्याच युद्धनौकेवर मिसाईल डागले; 19 नौसैनिकांचा मृत्यू
अजब! चंद्राचा तुकडा विक्रीला; किंमत करोडोंच्या घरात
CoronaVirus नियम बदलले, १५५९ रुग्ण बरे झाले : आरोग्य मंत्रालय