Kerala Floods : केरळच्या पावसात उद्ध्वस्त झाला दुर्मीळ ठेवा, कोट्यवधीचे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 02:36 PM2018-08-29T14:36:35+5:302018-08-29T14:58:32+5:30

मुसळधार पावसानंतर केरळमध्ये आलेला पूर आता हळुहळू ओसरू लागला आहे. मात्र पाणी ओसरू लागल्यानंतर या पुरामुळे झालेल्या नुकसानीचे विदारक चित्र समोर येऊ लागले आहे.

Kerala floods News | Kerala Floods : केरळच्या पावसात उद्ध्वस्त झाला दुर्मीळ ठेवा, कोट्यवधीचे नुकसान 

Kerala Floods : केरळच्या पावसात उद्ध्वस्त झाला दुर्मीळ ठेवा, कोट्यवधीचे नुकसान 

Next

कोची -  मुसळधार पावसानंतर केरळमध्ये आलेला पूर आता हळुहळू ओसरू लागला आहे. मात्र पाणी ओसरू लागल्यानंतर या पुरामुळे झालेल्या नुकसानीचे विदारक चित्र समोर येऊ लागले आहे. केरळमधील अरनमुला जिल्ह्यातील दुर्मीळ ठेव्याचेही या पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अरनमुला जिल्हा विशेष प्रकारचे आसरे तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच या आरशांना युनेस्कोचे जीआय मानांकन मिळालेले आहे. हे मानांकन अशा वस्तूंनाच मिळते ज्या वस्तुंची निर्मिती करण्याचा अधिकार त्या प्रदेशाकडे असतो.  

अरनमुलामधील हे आरसे ही केरळच्या सर्वात जुन्या कलात्मक वारशांपैकी एक कला आहे. हे आरसे कथील आणि तांब्याच्या मिश्रणापासून बनवले जातात. ही कला अरनमुला जिल्ह्यातील केवळ 22 कुटुंबांनाच अवगत आहे. अरनमुला कन्नडी नावाने प्रसिद्ध असलेले हे आरसे केरळची अधिकृत भेटवस्तू म्हणून ओळखले जातात. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा, प्रिन्स चार्ल्स, भारताचे राष्ट्रपती तसेच पंतप्रधानांनाही हे आरसे भेट म्हणून देण्यात आलेले आहेत. 



वर्तवण्यात येत असलेल्या अंदाजानुसार या महापुरामध्ये शिल्पकारांना सुमारे सहा हजार आरसे गमावले आहेत. या आरशांची किंत सुमारे दीड कोटी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हे आरसे बनवणाऱ्या कलाकारांपैकी एक असलेल्या पी. गोपालकुमार यांनी पुराची भीषणता वर्णन करताना सांगितले की, पुराचे पाणी माझ्या वर्कशॉपमध्ये घुसत होते. मी एका आरशाला पकडले तर दुसरा हातातून निसटत होता. पाणी गळ्यापर्यंत पोहोचले होते. तोपर्यंत अनेक आरसे वाहून गेले होते. 

Web Title: Kerala floods News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.