अलापुझ्झाः केरळमधल्या अलापुझ्झामध्ये एका मुस्लिम समाजानं मशीद परिसरात एका हिंदू मुलीचं लग्न लावून समाजापुढे एक अनोखं उदाहरण ठेवलं आहे. अलापुझ्झामधल्या चेरुवल्ली स्थित जुमा मशीद परिसरात पारंपरिक हिंदू पद्धतीनुसार हे लग्न करण्यात आलं. मशीद कमिटीनं लग्न संपन्न झाल्यानंतर जेवणाचंही आयोजन केलं होतं. ज्यात हिंदू-मुस्लिम दोन्ही समुदायातील लोक सहभागी होते. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीसुद्धा मुस्लिम समाजाच्या या स्तुत्य उपक्रमाचं कौतुक केलं आहे. काय आहे प्रकरण?अंजू (22)च्या वडिलांचं दोन वर्षांपूर्वीच एका अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या आईला मुलीच्या लग्नाची चिंता सतावत होती. घरातील परिस्थिती ठीक नसल्याच्या कारणास्तव लग्नाच्या खर्चाची व्यवस्था होऊ शकली नाही. अशातच आईनं मुलीचं लग्न करण्यासाठी स्थानिक मशीद प्रशासनाकडे आर्थिक मदत मागितली. मशीद प्रशासनानं पूर्ण मदत करण्याचा विश्वास दिला. अंजूचं लग्न 19 जानेवारीला शरदबरोबर ठरलं होतं. पारंपरिक रितीरिवाजात झालं लग्नरविवारी मशीद परिसरात फुलांची सजावट करण्यात आली होती. मशीद परिसरात मंडप बनवण्यात आलं असून, आतमध्ये बैठकीची व्यवस्था केली होती. पूर्णतः हिंदू परंपरेनं अंजू आणि शरद यांचं लग्न लावून देण्यात आलं. लग्नानंतर आलेल्या पाहुण्या मंडळींसाठी मशीद परिसरात जेवणाची सोय करण्यात आली. सर्वच लोकांना शाकाहारी जेवण वाढण्यात आलं. या लग्न समारंभात दोन्ही वधू-वर या बाजूंकडून जवळपास 1 हजार लोक सहभागी झाले. या मशीद कमिटीनं वधूला सोन्याचे 10 दागिने आणि 2 लाख रुपयांचं उपहार दिलं.सीएम पिनराई विजयन यांनी केलं कौतुककेरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी मुस्लिम समाजाच्या या उपक्रमाचं कौतुक केलं आहे. सीएमनं नव्या जोडप्याला फेसबुकवरून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी मुस्लिम समुदायाचीही प्रशंसा केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालं लग्नाचं कार्डअंजू आणि शरदच्या लग्नाचं कार्ड सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. अंजूच्या कुटुंबीयांच्या आग्रहाखातर आम्ही लग्नाचं आयोजन करत आहोत. सर्वच जण या लग्नात सहभागी होण्यासाठी आमंत्रित आहेत. आता सोशल मीडिया युजर्सनं या नव्या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मुस्लिम समुदायाकडूनही कौतुक करत आहेत.
मशीद परिसरात झाला हिंदू मुलीचा विवाह; CM पिनराई विजयन यांनी शेअर केला फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 10:54 AM
केरळमधल्या अलापुझ्झामध्ये एका मुस्लिम समाजानं मशीद परिसरात एका हिंदू मुलीचं लग्न लावून समाजापुढे एक अनोखं उदाहरण ठेवलं आहे.
ठळक मुद्देमुस्लिम समाजानं मशीद परिसरात एका हिंदू मुलीचं लग्न लावून समाजापुढे एक अनोखं उदाहरण ठेवलं आहे.अलापुझ्झामधल्या चेरुवल्ली स्थित जुमा मशीद परिसरात पारंपरिक हिंदू पद्धतीनुसार हे लग्न करण्यात आलं. मशीद कमिटीनं लग्न संपन्न झाल्यानंतर जेवणाचंही आयोजन केलं होतं.