नवी दिल्ली : केरळातील तिरुवनंतपुरमध्ये भारतीय जनता युवा मोर्चा आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. यादरम्यान कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा मारा करत अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, एसएफआय कार्यकर्ता अखिल याच्यावरील हल्ल्याच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चा आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये निदर्शने केली. दरम्यान, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केरळपोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली एसएफआयच्या आठ सदस्यांविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे.
दरम्यान, केरळमध्ये भारतीय जनता पार्टी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकपा) यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळते. दोन्ही पक्ष एकमेकांवर नेहमची आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात. कन्नूर जेलमध्ये 2004 मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्याची हत्या केल्याप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या नऊ कार्यकर्त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. देशातील पहिलीच ही राजकीय हत्या जेलच्या आतमध्ये झाल्याची शक्यता आहे. त्यानंतर अनेकदा केरळमध्ये भारतीय जनता पार्टी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी यांच्यातील वाद पाहयला मिळतो.