What a hero! केविन पीटरसनची PM मोदींवर स्तुतिसुमने; पाहा, नेमकं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 11:14 AM2021-09-24T11:14:19+5:302021-09-24T11:21:59+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटवर केविन पीटरसनने ट्विट करत प्रशंसा केली आहे.
नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारवर अनेकविध कारणांवरून विरोधी पक्ष टीका करत असताना, दुसरीकडे कोरोना संकटातील कामगिरीबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारचे कौतुक केले आहे. मात्र, यातच आता इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनने एक ट्विट करत पंतप्रधाननरेंद्र मोदींची अगदी तोंडभरून स्तुती केली आहे. यावेळी भारावून जात पीटरसनने पंतप्रधान मोदींना व्हॉट अ हिरो, असे म्हटले आहे. (kevin pietersen praises pm modi is a global leader standing up for the planets rhino species)
“कोरोना काळात भारताने केले, ते अन्य कुणीही करु शकला नाही”; SC ने केले मोदी सरकारचे कौतुक
आसाम सरकारने बेकायदेशीरपणे होणारी गेंड्यांची शिकार रोखण्यासाठी जागतिक गेंडा दिनी गेंड्याच्या शिंगांची होळी करत शिकाऱ्यांना गंभीर इशारा दिला. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी केलेले ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रिट्विट करत कौतुक केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या याच ट्विटवर केविन पीटरसनने ट्विट करत प्रशंसा केली आहे.
अबब! OYO Hotels तब्बल १ अब्ज डॉलर्सचा IPO आणण्याच्या तयारीत; गुंतवणुकीची सुवर्ण संधी
धन्यवाद नरेंद्र मोदी
केविन पीटरसनने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, धन्यवाद, नरेंद्र मोदी. एक जागतिक नेता गेंड्यांच्या प्रजातीसाठी ठोस भूमिका घेत आहे. अन्य नेत्यांनीही अशीच भूमिका घेतली पाहिजे. यामुळेच भारतात गेंड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. व्हॉट अ हिरो, असे पीटरसनने म्हटले आहे. याआधी आसाम टीमची प्रशंसनीय कामगिरी. एक शिंगाचा गेंडा भारताचा गौरव आहे आणि त्याच्या भल्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील, असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले होते.
“एक दिवस जागतिक स्तरावरील सगळे संघ पाकिस्तानात खेळायला येतील”
Thank you, @narendramodi! A global leader standing up for the planets rhino species!
— Kevin Pietersen🦏 (@KP24) September 23, 2021
If only more leaders would do the same.
And this is the reason why rhino numbers in India are rising exponentially!
What a hero! 🙏🏽 https://t.co/6ol4df0NpV
दरम्यान, आसाम आणि भारतासाठी ऐतिहासिक दिवस आहे. आसाममध्ये बेकायदेशीर शिकार थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दृष्टीकोन लक्षात घेता आम्ही एक शिंगाच्या गेंड्याचा २४७९ शिंगांचा साठा जाळण्याचा निर्णय घेतला आहे, जो जगातील अशा पद्दतीचा पहिलाच आहे, असे ट्विट आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी केले होते.