नवी दिल्ली : कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात शेतमालाची विक्री, तसेच ग्राहकांना प्रत्यक्ष लाभ होण्यासाठी किसान सभा हे अॅप विकसित करण्यात आले आहे. यामुळे शेतकरी घरबसल्या शेतमालाची विक्री करू शकतात. या अॅपचा मोठा लाभ सहा घटकांना होईल, असा विश्वास बाळगला जात आहे.
येथील औद्योगिक आणि वैज्ञानिक संशोधन परिषदेने (सीएसआयआर) हे अॅप विकसित केले आहे. शेतकरी, बाजार समितीतील विक्रेते, वाहतूकदार, भाजी बाजारातील मंडळ सदस्य, सेवापुरवठादार आणि ग्राहक हे किसान सभा अॅपचे सहा घटक असणार आहेत. कोरोनाच्या काळात शेतमाल बाजारात पाठविणे, बियाणे व खतांसाठीची प्रतीक्षा, शेतमालाला योग्य भाव आदी बाबतीत हे अॅप महत्त्वपूर्ण आहे. या अॅपचे उद्घाटन आयसीएआरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. त्रिलोचन मोहपात्रा यांच्या हस्ते करण्यात आले. आयसीएआर आणि सीएसआयआर यांनी एकत्र काम करून कृषी विज्ञान केंद्रांचे नेटवर्क या कामासाठी वापरावे, अशी सूचना त्यांनी केली. उद्योग, एमएसएमई, वाहतूकदार आणि गुंतवणूकदार यांनीही आयसीएआरसोबत पुढे यावे, अशी अपेक्षा सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी व्यक्त केली.अॅप असे काम करतेशेतकरी, वाहतूकदार, सेवापुरवठादार (खते, बी-बियाणे यांचे विक्रेते, शीतगृहे, गोदाम मालक, मंडईतील विक्रेते) तसेच ग्राहक (किरकोळ विक्रेते, आॅनलाईन दुकाने, संस्थात्मक ग्राहक) यांना वेळेवर आणि प्रत्यक्ष जोडते. सर्व सेवा एकाच ठिकाणी असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळण्यासाठी होतो. खते, बी-बियाणो विक्रेत्यांनाही जास्त शेतकºयांपर्यंत पोहोचता येते.शीतगृहे, गोदाम मालक आणि ग्राहकांना उपयुक्त. थेट शेतकºयांकडून खरेदी. शेतकºयांना कमीत कमी खर्चात आणि वेळेत मध्यस्थांखेरीज संस्थात्मक ग्राहकांपर्यंत मालाची खरेदी-विक्री करण्यासाठी आधारभूत ठरून नफा वाढेल. चांगली मागणी असणाºया बाजारपेठा जोडणे, माल पोहोचवण्यासाठी स्वस्त वाहतूक सेवा उपलब्ध होणे, शेतकºयांचा नफा वाढण्यास उपयुक्त.आझादपूरमध्ये अभ्यासकृषी बाजार हे संघिटत नसतात. त्यामुळे बराचसा कृषी माल फुकट जातो किंवा कमी किमतीत विक्री होतो.हे अॅप विकसित करण्यापूर्वी आशियातील सर्वात मोठी मंडई असलेल्या आझादपूर मंडईतल्या सुमारे ५०० हून अधिक शेतकºयांच्या मुलाखती घेऊन, ६ दिवस व्यापाºयांचे, वाहतूकदारांचे सर्वेक्षण करून, त्यांच्या वेगवेगळ्या गरजांचा तपशीलवार प्राथमिक अभ्यास करण्यात आला.