Coal Crisis : देश अद्यापही वीज संकटाच्या उंबरठ्यावरच, २०१५ नंतर पहिल्यांदाच करणार ‘कोळसा आयात’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 09:02 AM2022-05-29T09:02:13+5:302022-05-29T09:09:58+5:30

Coal Crisis : सरकारनं कोळसा सचिव, कोल इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्र, तसंच राज्याच्या वरिष्ठ ऊर्जा अधिकाऱ्यांना यासंदर्भातील पत्र लिहिलं आहे.

know about coal india limited to import fuel for first time after 2015 as power crisis loom reuters report coal crisis | Coal Crisis : देश अद्यापही वीज संकटाच्या उंबरठ्यावरच, २०१५ नंतर पहिल्यांदाच करणार ‘कोळसा आयात’

Coal Crisis : देश अद्यापही वीज संकटाच्या उंबरठ्यावरच, २०१५ नंतर पहिल्यांदाच करणार ‘कोळसा आयात’

Next

Coal Crisis : जगातील सर्वात मोठी कोळसा कंपनी आणि केंद्र सरकारच्या मालकीची कोल इंडिया लिमिटेड (Coal India Limited) ही २०१५ नंतर (मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर) पहिल्यांदाच कोळसा आयात (Coal Import) करण्याच्या तयारीत आहे. देशातील कोळसा संकटाचा सामना करण्यासाठी कंपनीनं हा निर्णय घेतला आहे. आयात करण्यात आलेला कोळसा कंपनी देशभरातील वीज उत्पादन केंद्रांना देणार आहे. शनिवारी यासंदर्भातील एक पत्रही समोर आल्याची माहिती वृत्तसंस्था रॉयटर्सनं दिली आहे.

कोळशाच्या संकटामुळे पुन्हा भारनियमन होण्याची भीती अधिक गडद झाली आहे. या समस्यांना तोंड देण्यासाठी ऊर्जा मंत्रालयानं अनेक पावले उचलली आहेत. असं झाल्यास कोल इंडियानं कोळसा आयात करण्याची २०१५ नंतरची ही पहिलीच वेळ असेल. एप्रिलच्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्य आणि केंद्राच्या अधिकाऱ्यांनी कोळशाचा साठा सुनिश्चित करण्यास सांगितलं आहे. एप्रिलमध्ये, देशभरातील थर्मल पॉवर प्लांट्सना सहा वर्षांत प्रथमच कोळशाच्या सर्वात वाईट संकटाचा सामना करावा लागला. याचाच परिणाम अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्याचे प्रकार घडले होते.

दरम्यान, कोळस आयात करण्याशी निगडीत निरनिराळ्या निविदांमुळे गोधंळाची परिस्थिती निर्माण होईल. यामुळे कोल इंडियाच्या माध्यमातूनच कोळशाची खरेदी केली जावी, अशी मागणी जवळपास सर्वच राज्यांकडून करण्यात आल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे. याच मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचंही सांगण्यात आलं

Web Title: know about coal india limited to import fuel for first time after 2015 as power crisis loom reuters report coal crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.