बंगळुरु - कर्नाटकात सध्या घडणाऱ्या राजकीय नाट्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष कर्नाटकवर लागून राहिलं आहे. आज मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची अग्निपरीक्षा आहे. कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी काँग्रेस-जेडीएसला प्रयत्न करावे लागणार आहेत. बहुमत सिद्ध केलं नाही तर कर्नाटकातील सरकार कोसळण्याची शक्यता आहे. 225 विधानसभा सदस्य संख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेत बहुमतासाठी 113 मतांची गरज आहे. परंतु 15 आमदारांच्या बंडखोरीमुळे हे सगळं चित्र पालटलं आहे.
15 आमदारांच्या बंडखोरीमुळे कर्नाटकात बहुमत सिद्ध करण्यासाठी 106 मतांची गरज आहे. कर्नाटक विधानसभेतील हा आकड्यांचा खेळ कसा आहे ते आपण पाहूया
असा असेल आकड्यांचा खेळ
- 225 - कर्नाटक विधानसभेतीला ही आहे एकूण सदस्यसंख्या, 224 लोकांमधून निवडून आलेले सदस्य तर उर्वरित 1 सदस्य स्वीकृत असतो.
- 210 - जर बंडखोर 15 आमदार सभागृहात गैरहजर राहिले तर एकूण संख्याबळ होईल 210, काँग्रेसचे बंडखोर आमदार रामलिंगा रेड्डी यांनी त्यांचा राजीनामा परत घेतला आहे. रेड्डी यांनी सरकारला मतदान करणार असल्याचं सांगितले आहे.
- 106 - जर 15 आमदारांनी मतदानात सहभाग घेतला नाही तर बहुमतासाठी लागणारी मॅजिक फिगर साठी हे संख्याबळ लागेल.
- 105 - भाजपाकडे एकूण 105 आमदार आहेत. त्यात बंडखोर आमदारांनी मतदानात सहभाग घेतला नाही तर त्यांना कुमारस्वामी सरकार पाडण्यासाठी 1 मताची गरज लागेल. दोन अपक्ष आमदारांनी याआधीच भाजपाला पाठिंबा दिला आहे.
- 102 - काँग्रेस आणि जेडीएस यांच्या आमदारांची संख्या, स्पीकर आणि स्वीकृत आमदारांना मिळून आघाडी सरकारला 102 आमदारांचे पाठबळ आहे. मात्र समसमान मतदान झालं तर विधानसभा अध्यक्षांना मत देण्याची संधी मिळेल.
- 3 - इतर आणि अपक्ष आमदार, दोन अपक्ष आमदारांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे. फक्त बसपाचे एकमेव आमदार एन महेश कोणाला पाठिंबा देतील यावर अजून तरी सस्पेन्स आहे.
- 6 - काँग्रेस-जेडीएस सरकार वाचविण्यासाठी कमीत कमी 6 बंडखोर आमदारांना आपल्या बाजूने वळविणे गरजेचे आहे. जर एक बंडखोर अयोग्य घोषित केला गेला. बसपा आमदाराने आघाडी सरकारच्या बाजूने मतदान केले तर कुमारस्वामी यांना सरकार वाचविण्यासाठी चार बंडखोर आमदारांची गरज लागणार आहे.