मुसळधार पावसामुळे केरळमधील कोची विमानतळ बंद, मृतांची संख्या 45वर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 11:35 AM2018-08-15T11:35:59+5:302018-08-15T11:39:48+5:30
केरळला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे.
कोची- केरळला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. केरळच्या अनेक भागांत जोरदार पाऊस कोसळत असल्यानं अनेक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहेत. तर या पावसामुळे आलेल्या पुरात आतापर्यंत 45 जणांचा मृत्यू झाला आहे. पेरियार नदीवरच्या धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे कोची विमानतळ बंद करण्यात आला आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट ते 18 ऑगस्टच्या दुपारी 2 वाजेपर्यंत या विमानतळावरून कोणतंही विमान उड्डाण होणार नाही.
मुन्नारमध्ये अतिवृष्टीमुळे एक इमारत कोसळली असून, त्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर 6 मुलं या दुर्घटनेतून सुखरूप बचावली आहेत. तर गेल्या आठवड्यात कोसळलेल्या पावसानं 45 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोची विमानतळ परिसरातही मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळेच आजपासून तो बंद करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे प्रभावित झाली आहेत. पेरियार, इडुक्की आणि चेरुथोनी धरणांचे दरवाजे उघडल्यामुळे सतर्कतेच्या दृष्टीनं हे विमानतळ बंद करण्यात आलं आहे.
Kerala: Kochi airport shut till August 18, 2 pm due to heavy rains. #Keralarainspic.twitter.com/NXNr9iem3u
— ANI (@ANI) August 15, 2018
या पुरात आतापर्यंत 45 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 55 हजारांपेक्षा अधिक लोक बेघर झाले आहेत. एर्नाकुलम, त्रिशूर आणि वयानड जिल्ह्यांमध्ये पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. शिवाय या भागात रेड अलर्टही जारी करण्यात आलं आहे. दरम्यान, राज्यातील पोलीस, एनडीआरएफ, लष्कर आणि काही संघटनांकडून पूरग्रस्त भागातील लोकांची मदत करण्यात येत आहे. या नैसर्गिक संकटामुळे मोठे नुकसान झाले आहे.