आता तुम्ही खिशात घेऊन फिरू शकणार व्हेंटिलेटर, भारतीय वैज्ञानिकानं लावला जबरदस्त शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 03:11 PM2021-06-11T15:11:39+5:302021-06-11T15:14:31+5:30

Pocket Ventilator : भारतातील वैज्ञानिकानं तयार केलं 'पॉकेट व्हेंटिलेटर'. हा नवा शोध नागरिकांसाठी लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. पाहा काय आहे खासियत.

kolkata scientist innovate pocket ventilator to aide covid 19 patients can charge it by android smartphone charger | आता तुम्ही खिशात घेऊन फिरू शकणार व्हेंटिलेटर, भारतीय वैज्ञानिकानं लावला जबरदस्त शोध

आता तुम्ही खिशात घेऊन फिरू शकणार व्हेंटिलेटर, भारतीय वैज्ञानिकानं लावला जबरदस्त शोध

googlenewsNext
ठळक मुद्देभारतातील वैज्ञानिकानं तयार केलं 'पॉकेट व्हेंटिलेटर'. हा नवा शोध नागरिकांसाठी लाभदायक ठरण्याची शक्यता आहे.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला होता. सध्या रुग्णसंख्या तुलनेनं कमी होत असली तरी दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्सची कमतरता देशात जाणवली होती. परंतु कोलकात्यातील एका वैज्ञानिकानं यावर तोडगा काढला आहे. त्यांनी एका पॉकेट व्हेंटिलेटरची निर्मिती केली आहे. 

डॉ. रामेंद्र लाल मुखर्जी असं त्यांचं नाव असून ते एक इंजिनिअर आहेत आणि सातत्यानं अशाप्रकारचे नवनव्या गोष्टींवर काम करत असतात. त्यांनी नुकताच बॅटरीवर चालणारा व्हेंटिलेटर तयार केला आहे. यामुळे एखाद्या रुग्णाला त्वरित दिलासा मिळू शकतो. तसंच हा व्हेंटिलेटर सहजरित्या काम करू शकतो आणि स्वस्तदेखील आहे. अशातच जर रुग्णाला श्वास घेण्यास त्रास जाणवत असेल तर तो रुग्णांसाठी अतिशय दिलासादायकही ठरू शकतो.

"कोरोना संकटादरम्यान माझ्या शरीरातील ऑक्सिजनची लेव्हल ८८ पर्यंत पोहोचली होती. तेव्हा माझ्या कुटुंबीयांनी मला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. परंतु मी संकटातून बाहेर आलो. यानंतर माझ्या डोक्यात रुग्णांच्या मदतीसाठी काहीतरी करण्याची कल्पना आली. माझी तब्येत बरी झाल्यानंतर मी यावर काम करण्यास सुरूवात केली आणि २० दिवसांमध्ये ते तयारही झालं," असं डॉ. मुखर्जी म्हणाले. 

मास्क जोडलेला

मिळालेल्या माहितीनुसार या डिव्हाईसमध्ये दोन युनिट आहेत. पॉवर आणि व्हेंटिलेटर हे मास्कशी जोडलेले आहेत. एक बटन दाबल्यानंतर व्हेंटिलेटर काम करण्यास सुरूवात करतो. तसंच याद्वारे शुद्ध ऑक्सिजन रुग्णापर्यंत पोहोचवला जातो. जर कोणत्याही रुग्णाला कोरोनाची लागण झाली असेल तर युव्ही फिल्टर विषाणूचा खात्मा करण्यास मदत करतो आणि शुद्ध हवा रुग्णापर्यंत पोहोचवतो, असं मुखर्जी म्हणाले. ब्लॅक फंगसचे रुग्ण जेव्हा वाढत आहेत, अशा परिस्थितीत हे रुग्णांसाठी मदतीचं ठरू शकतं असा दावाही त्यांनी केला आहे. 

काय आहे विशेष?

या व्हेंटिलेटरची एक महत्त्वाची बाब म्हणजे यात एक कंट्रोल नॉब आहे जो हवेचा फ्लो कंट्रोल करतो. याचं वजन केवळ २५० ग्राम आहे. हा व्हेंटिलेटर ब‌ॅटरीच्या मदतीनंही चालतो. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर हा व्हेंटिलेटर ८ तास काम करतो. तसंच अँड्रॉईड फोनच्या चार्जरनंही हा व्हेंटिलेटर चार्ज करता येऊ शकतो.
 

Read in English

Web Title: kolkata scientist innovate pocket ventilator to aide covid 19 patients can charge it by android smartphone charger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.