चीनच्या हालचालींचा सॅटेलाइट पुरावा; LACजवळ तैनात केले १००० सैनिक!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 09:16 AM2020-05-26T09:16:35+5:302020-05-26T09:36:01+5:30
24 मे रोजी झालेल्या फोटोंच्या विश्लेषणामध्ये आयटीबीपीच्या छावणीपासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर छोट्या बोटी वापरुन चिनी सैन्यांची संभाव्य हालचाल दिसून येते.
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सीमेवर चीनच्या कुरापती वाढल्या आहेत. खबरदारीचा उपाय भारताने देखील या भागातील आपले लष्करी बळ वाढविले आहे. लडाख सीमेवर दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने आले आहेत. यातच दोन्ही सैन्यांमध्ये चर्चेद्वारे कोणताही तोडगा निघाला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, अशा परिस्थितीत भारतीय लष्कर नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) प्रदीर्घ तणावासाठी सज्ज आहे. दोन्ही देशांनी या भागात अतिरिक्त फौजफाटा तैनात केला आहे. दोन्ही देशांकडून एक-एक हजाराहून अधिक सैनिक अतिशय कमी अंतरावर तैनात आहेत.
युरोपियन स्पेस एजन्सीने टिपलेल्या सॅटेलाइट फोटोंमध्ये लडाखमधील पांगोंग लेकजवळ आयटीबीपी कॅम्पसमोर चिनी सैन्य तैनात असल्याचे दिसून येते. गेल्या एका महिन्यातील फोटोंशी तुलना केली असता, या कालावधीत एलएसीच्या दुसऱ्या बाजूला चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) च्या हालचाली उघडकीस आल्या आहेत. 24 मे रोजी झालेल्या फोटोंच्या विश्लेषणामध्ये आयटीबीपीच्या छावणीपासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर छोट्या बोटी वापरुन चिनी सैन्यांची संभाव्य हालचाल दिसून येते.
फोटोंच्या ऐतिहासिक विश्लेषणावरून असे दिसून येते की, सीमेच्या या बाजूला भारताच्या भागात आयटीबीपीचे अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी कॅम्प आहे. हे फोटो एलएसीपासून सुमारे 2.5 किमी अंतरावर चीनचे सैनिक तैनात असल्याचे दर्शवितात. मे 2020 च्या पहिल्या आठवड्यात घेतलेल्या फोटोंमध्ये चीनचे सैनिक तैनात असल्याचे दिसत नाही.
4 मे आणि 24 मे 2020 मधील फोटोंची तुलना (सोर्स: युरोपियन स्पेस एजन्सी)
एलएसीच्या भारताच्या बाजूने फोटोंमध्ये आयटीबीपीकडून अतिरिक्त जवान तैनात असल्याचे दिसते.
2020 एप्रिल ते मे दरम्यान आयटीबीपी कॅम्प. एलएसीच्या दुसऱ्या बाजूला तलावाच्या छोट्या बोटीतून होणार्या हालचालींचे फोटो देखील दर्शवितात. (सोर्स: युरोपियन स्पेस एजन्सी)
24 एप्रिल आणि 24 मे च्या एलएसी येथे तलावाच्या दोन्ही बाजूंच्या फोटोंची तुलना (सोर्स: युरोपियन स्पेस एजन्सी)
या फोटोंमध्ये स्पष्ट होते की, 5 मे रोजी झालेल्या चकमकीनंतर चीनने अतिरिक्त फौजफाटा तैनात केला आहे.
फोटोंनुसार दिसते की, तलावाचे संपूर्ण क्षेत्र आणि एलएसीच्या दोन्ही बाजूला सैन्य (सोर्स: युरोपियन स्पेस एजन्सी)