चिंता वाढली! नव्या संकटाचा इशारा, देशाला केदारनाथपेक्षाही मोठ्या नैसर्गिक आपत्तीचा धोका, रिपोर्टमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 01:36 PM2020-11-10T13:36:23+5:302020-11-10T13:40:52+5:30

Natural Disaster : भारतासह देशात एक भयंकर नैसर्गिक संकट, मोठी आपत्ती निर्माण होऊ शकते. एका रिपोर्टमधून याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे.

ladakh melting glacier could lead big natural disaster at science | चिंता वाढली! नव्या संकटाचा इशारा, देशाला केदारनाथपेक्षाही मोठ्या नैसर्गिक आपत्तीचा धोका, रिपोर्टमधून खुलासा

चिंता वाढली! नव्या संकटाचा इशारा, देशाला केदारनाथपेक्षाही मोठ्या नैसर्गिक आपत्तीचा धोका, रिपोर्टमधून खुलासा

googlenewsNext

नवी दिल्ली - लडाखमध्ये गोठलेला बर्फ वितळू लागला तर काय होईल याचा अंदाज करणं खूप कठीण आहे. मात्र जर असं झालं तर उत्तर भारतासह देशात एक भयंकर नैसर्गिक संकट, मोठी आपत्ती निर्माण होऊ शकते. एका रिपोर्टमधून याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे लडाखमधील ग्लेशिअर आणि गोठलेली तलावांना धोका निर्माण झाला आहे. लडाख हे जगातील सर्वोच्च स्थानांपैकी एक आहे. येथे अत्यंत कमी तापमान आहे. हिवाळ्यात तापमान -16 पर्यंत असते. मात्र, वेगाने वाढणार्‍या तापमानामुळे लडाखमधील ग्लेशिअर वितळत आहेत. 

बर्फाचे तलावही वितळत आहेत. तलावांमध्ये बर्फ वितळल्यास हिमालय प्रदेशात पूर येऊ शकतो. दक्षिण आशिया संस्था आणि हीडलबर्ग सेंटर फॉर द एनव्हायरनमेंट ऑफ रुपर्टो कॅरोला येथील संशोधकांनी लडाखमधील बर्फाळ परिसरात संशोधन केले. भूगर्भशास्त्रज्ञ प्राध्यापक मार्कस नुसरर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लडाखच्या ग्लेशिअर रिसर्चसाठी सॅटेलाइट फोटोंचा वापर केला गेला. ग्लेशिअरचे बर्फ वेगाने वितळल्यास हिमालयातील सखल भागात पूरस्थिती निर्माण होऊ शकते.

देशात केदारनाथमध्ये आलेल्या पूरावेळी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ग्लेशिअर फुटून कधीही पूर येऊ शकतो. म्हणूनच भारतासह सर्व आशियाई देशांनी ग्लोबल वार्मिंग कमी करण्याचा प्रयत्न करणं अत्यंत महत्वाचं आहे. भविष्यात असे पूर कसे टाळावे हे आमच्या अभ्यासातून समोर येत आहे असं नुसरेर यांनी म्हटलं आहे. ग्लेशिअर तुटल्यामुळे जो पूर येतो त्याला आउटब्रस्ट फ्लड्स (GLOFS) म्हणतात. हा अभ्यास नॅचरल हॅजर्ड्स नावाच्या सायन्स मॅगझिनमध्ये प्रसिद्ध झाला आहे.

फक्त भारताच्या लडाख भागातील ग्लेशिअरच वितळत नाही आहेत तर, हवामान बदल आणि ग्लोबल वार्मिंगमुळे जगभरातील अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. नुसरेर यांच्या टीमने ऑगस्ट 2014 लडाखमध्ये आलेल्या पुराचा अभ्यास केला आहे. पुराचा फटका हा शेकडो घरं, शेतीला मोठ्या प्रमाणात बसतो. जनजीवन विस्कळीत होऊन मोठं नुकसान होतं. ऑगस्ट 2014मध्ये लडाखमध्ये जो पूर आला तो भाग 5300 मीटर उंचीवर आहे. जेव्हा पाण्याचा प्रवाह मोठा असेल तेव्हा खूप नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगभरातील संशोधक ग्लोबल वार्मिंग कमी करण्याचे आवाहन सर्वांना देशांना करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: ladakh melting glacier could lead big natural disaster at science

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.