शहरं
Join us  
Trending Stories
1
काही लोकांनी धोकेबाजी करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
2
“जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
3
महाराष्ट्रातील मुस्लिमांनी पुन्हा तोडले ओवेसींचे स्वप्न; MIM ला 1 टक्काही मते मिळाली नाही
4
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
5
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
6
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
7
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
9
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
10
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नाना पटोलेंचा अखेर विजय; २०८ मतांनी भाजप उमेदवाराचा पराभव
12
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
15
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
16
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
17
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
19
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
20
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...

Lakhimpur Kheri Violence: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरीमध्ये कसा उफाळला हिंसाचार? असा घडला संपूर्ण घटनाक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2021 12:34 PM

Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर खीरीमधील हिंसाचारामध्ये एक पत्रकार आणि चार शेतकऱ्यांसह नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन भाजपा कार्यकर्ते आणि एका ड्रायव्हरचाही समावेश आहे. त्यांची लिंचिंग झाल्याचा आरोप होत आहे.

लखनौ - उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे २५ सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा तेनी यांच्या एका विधानाविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाला आठवडाभरानंतर हिंसक वळण लागले आहे. (Lakhimpur Kheri Violence) या हिंसाचारामध्ये एक पत्रकार आणि चार शेतकऱ्यांसह नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन भाजपा कार्यकर्ते आणि एका ड्रायव्हरचाही समावेश आहे. त्यांची लिंचिंग झाल्याचा आरोप होत आहे.

केंद्रीय मंत्री अजय मिश्रा तेनी यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून २५ सप्टेंबर रोजी हे आंदोलन सुरू झाले होते. एका कार्यक्रमाला जाताना अजय मिश्रा यांना आंदोलक शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले होते. तेव्हा शेतकऱ्यांनी वेळीच सुधरावं, अन्यथा त्यांना सुधारले जाईल, असा इशारा दिला होता. तेव्हापासून केंद्रीय मंत्र्यांविरोधात आंदोलन सुरू आहे. मात्र शेतकऱ्यांकडून त्यांचे वक्तव्य मोडतोड करून सादर केले जात असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, रविवारी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे तेनी यांच्या उपस्थितीत एका सरकारी प्रोजेक्टच्या अनावरणासाठी येत असताना परिस्थिती अधिक चिघळली. शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री ज्या हेलिपॅडवर उतरणार होते त्या हेलिपॅडवर कब्जा केला. त्यानंतर कार्यक्रमाला जाण्यासाठी  रस्त्याने जायचे ठरवले. केशव प्रसाद मौर्य आणि तेनी यांनी दुपारी लखीमपूर येथे प्रकल्पाचे उदघाटन केले. त्यानंतर केंद्रीय मंत्री आपल्या बनवीरपूर यि गावाकडे रवाना झाले. तिथे कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र तत्पूर्वीच तिकुनिया येथे हा हिंसाचार घडला. तेव्हापासून येथील वातावरण तापलेले आहे. शेतकऱ्यांचा दावा आहे की, केंद्रीय मंत्री तेनी यांचा मुलगा आशिष कुमार मोनू हत्यारबंद समर्थकांसह त्या गाडीमध्ये होता ज्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडले.  मात्र मोनू तिथून पळ काढण्यात यशस्वी ठरला. शेतकऱ्यांनी मंत्री तेनी आणि त्यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  सध्या आंदोलक शेतकरी परिसरातील अग्रसेन इंटर कॉलेजमध्ये शेतकऱ्यांचे मृतदेह घेऊन आंदोलन करत आहेत. 

दरम्यान, या घटनेबाबत मंत्र्यांनी सांगितले की, भाजपा कार्यकर्ते आपल्या गाड्यांमधून उपमुख्यमंत्र्यांना आणण्यासाठी जात होते. त्यादरम्यान शेतकऱ्यांनी दगड घेऊन त्यांच्यावर हल्ला केला. यात एक दगड ड्रायव्हरला लागला आणि त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी शेतकऱ्यांवर गेली. ड्रायव्हर आणि भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांनी गाडीतून खेचून काढले आणि त्यांची लिंचिंग केली. यावेळी माझा मुलगा ना गाडीत होता ना घटनास्थळी होता. 

घटनास्थळावरून समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तिकुनिया येथे भाजपा कार्यकर्त्यांना संतप्त शेतकऱ्यांनी मरेपर्यंत मारहाण केल्याचे दिसत आहे. दरम्यान, लखीमपूर येथील तणावाचे वातावरण पाहून नेत्यांना घटनास्थळी जाण्यापासून रोखण्यात आले आहे. तसेच अफवांवर लक्ष न देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. अशा परिस्थितीत हा मुद्दा राजकीयदृष्ट्या तापू शकतो. दरम्यान, लखीमपूरकडे जाण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रियंका गांधी, अखिलेश यादव, सतीश चंद्र मिश्रा यांना पोलिसांनी रोखले आहे.

टॅग्स :lakhimpur-pcलखीमपुरUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliticsराजकारण