मुंबई - वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात गेल्या १० महिन्यांपासून शेतकऱ्यांचे दिल्लीतील सीमांवर आंदोलन सुरू आहे. आता उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी जिल्ह्यात शेतकरी आंदोलनात मंत्र्यांच्या मुलाची कार शिरल्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून तेथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. येथील शेतकऱ्यांच्या भेटीसाठी निघालेल्या प्रियंका गांधींनापोलिसांनी अटक केल्याचे माहिती युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही यांनी ट्विटरवरुन दिली होती. आता प्रियंका गांधी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा, व्हिडिओ पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केला तेथील आहे. Lakhimpura Protest : Priyanka Gandhi cleans the room with a broom herself, video goes viral
प्रियंका गांधींना पोलिसांनी लखनौपासून 90 किमी अंतरावर असलेल्या सितापूर येथे स्थानबद्ध केलं आहे. प्रियंका गांधींचा पोलिसांसोबत संवाद आणि वाद साधतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसकडून आता आणखी एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये, प्रियंका गांधींच्या हातात झाडू दिसत आहे. स्वत: झाडूने रुम साफ करतानाचा त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी त्यांना सितापूर येथील ज्या गेस्ट हाऊसमध्ये स्थानबद्ध केलंय, तिथला हा व्हिडिओ आहे. दरम्यान, या गेस्ट हाऊसच्याबाहेर काँग्रेस समर्थक जमले असून पोलिसांकडून अन्याय होत असून प्रियंका गांधींच्या सुटकेची मागणी ते करत आहेत.
केंद्रातील मोदी सरकार आणि आंदोलक शेतकरी नेते आपापल्या भूमिकांवर ठाम असल्यामुळे अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. अलीकडेच शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला उत्तरेतील राज्यांत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आता, लखीमपूर येथील शेतकरी आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. आंदोलन थोपवता आले नाही, म्हणून आता शेतकऱ्यांनाच चिरडून टाकले. या नरसंहारावर जी लोक मूग गिळून गप्प बसलीत, त्यांनी या कालचक्राचा फेरा कायम स्मरणात ठेवावा, त्यांनाही अशाच प्रकारे एक दिवस निशाण्यावर घेतले जाईल. या प्रकरणाला सरळपणे पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे गृह राज्यमंत्री अजय मिश्र टोनी जबाबदार आहेत, या शब्दांत युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. वी. यांनी हल्लाबोल केला.
काय आहे घटना ?
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य एका कुश्तीच्या कार्यक्रमासाठी लखीमपूरच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आणि काही कार्यकर्ते दोन तीन गाड्यातून गेले. ज्या मार्गावर ते होते त्याच मार्गावर कृषी कायद्यांच्याविरोधात काही शेतकरी आंदोलन करत होते. भाजप कार्यकर्ते आणि आंदोलक यांच्यात बाचाबाची झाली आणि केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांच्या मुलानं आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावरच थेट गाडी घातल्याचा आरोप करण्यात येत आहे. मंत्र्याच्या मुलाचं नाव आशिष मिश्रा असं आहे. तर, आंदोलक शेतकऱ्यांनीच आधी दगडफेक केली आणि त्यातूनच मग वाद वाढत गेला. त्याच घटनेत भाजपच्या 4 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याचाही आरोप भाजप समर्थकांकडून होत आहे.