रांची : चारा घोटाळ्यातील चार प्रकरणांमध्ये तुरुंगात असलेले राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांची प्रकृती कमालीची खालावली आहे. त्यांना चालता येत नसून पायावर खोलवर जखमा आणि सूज आल्याचे सुत्रांनी सांगितले. तसेच त्यांची किंडनीही काम करत नसल्याने त्यांना दुसरीकडे हलविण्यात येणार असल्याचे समजते.
रांचीतील रिम्स रुग्णालयात लालू यांच्यावर वरिष्ठ डॉक्टर उमेश प्रसाद यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या तीन दिवसांपासून लालू यांची प्रकृती खालावत आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या पायांवर खोलवर जखमा झाल्याने चिंता आणखी वाढल्या आहेत. लालू यांची किडनी काम करत नसल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तविली आहे. त्यांची क्रिटनिन पातळी 1.85 वर पोहोचली आहे. मधुमेहही 190 वर पोहोचला आहे.
रिम्समध्ये लालू यांच्यावर उपचार करणे डॉक्टरांना दिवसेंदिवस कठीण जात असून पुढील दोन-तीन दिवसांत त्यांची प्रकृती सुधारली नाही तर राज्याबाहेरील मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात येण्याची शक्यता आहे.